नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “कौन बनेगा नगरसेवक”
*अत्यंत चुरशीच्या लढतीत पार पडलेल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या “कौन बनेगा नगरसेवक” व “कौन बनेगा नांदेड का प्रशांत किशोर” या अभिनव स्पर्धांमधील शितल खांडील व इतर २० विजेत्यांना भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.धर्मभूषण अॅड.दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.* महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध प्रभागांतून एकूण ८१ नगरसेवक निवडून आले. “कौन बनेगा नगरसेवक” या स्पर्धेत शेकडो मतदारांनी सहभाग नोंदवला. एसएमएसद्वारे एकूण १८०९ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १४८ जणांचे अंदाज अचूक ठरले.मात्र केवळ २० विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असल्याने सोडतीद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली.या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे –धीरज स्वामी,गायत्री तपके,सतीश सुगनचंदजी शर्मा, दीपक यादव,सुवर्णा जहागीरदार, प्रसाद देशपांडे,रामजी भानुशाली, जयवंत सोमवाड,मनोहर समसते, चंद्रकांत द्रौपदीवार,ज्ञानेश्वर चापके, साईनाथ कासरालीकर,प्रणित लोहगावे,भीमराव जोंधळे,शुभम कुलकर्णी,आकाश राक्षसमारे,शे. उस्मान शे.रफिक,सिद्धार्थ हत्तीअंबीरे,मोहम्मद इस्माईल खाजाभाई आदि.भाजपा नांदेड महानगर व अमरनाथ यात्री संघाच्या वतीने या दोन्ही स्पर्धांचे मोफत आयोजन करण्यात आले होते. सट्टेबाजीला आळा बसावा व नागरिकांमध्ये लोकशाही प्रक्रिये विषयी सकारात्मक सहभाग वाढावा या हेतूने दिलीप ठाकूर हे दरवेळी निवडणुका तसेच विश्वचषक क्रिकेट व फुटबॉल स्पर्धांच्या काळात अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करीत असतात.निकालाच्या दिवशी भाजपा मध्यवर्ती प्रचार कार्यालयात मोठ्या स्क्रीनवर निकाल दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यालय हे भाजप कार्यकर्ते व नागरिकांनी खचाखच भरले होते. याचवेळी दिलीप ठाकूर यांना अचानक सुचलेल्या कल्पनेतून “कौन बनेगा नांदेड का प्रशांत किशोर” ही स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत १८७ जणांनी सहभाग नोंदवला व विविध पक्षांचे किती नगरसेवक निवडून येतील याचा नेमका अंदाज कोणालाही बांधता आला नाही.मात्र ८० टक्के अचूक अंदाज नोंदविल्या बद्दल भाजपा महानगर सरचिटणीस शितल खांडील यांना “नांदेड का प्रशांत किशोर” हा सन्मान प्रदान करण्यात आला.भाजपा महानगर कार्यालयात झालेल्या समारंभात विजेत्यांना अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी संयोजक भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप ठाकूर यांनी स्पर्धा आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली.अमरनाथ राजूरकर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करत दिलीप ठाकूर यांच्या कल्पकतेचे विशेष कौतुक केले.ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेशसिंह ठाकूर, गोविंद कन्नडकर,लक्ष्मण खिसे,सुरेश लोट,कामाजी सरोदे,सुरेश शर्मा, भोला धुमाळ,संतोष भारती,शिवा लोट,अरुणकुमार काबरा,सुरेश निल्लावार आदिंनी परिश्रम घेवून हा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला.


stay connected