इंदापूर येथे झाले कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाच्या पोस्टरचे प्रकाशन

 इंदापूर येथे झाले कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाच्या पोस्टरचे प्रकाशन 




कडा ( वार्ताहर) :- आष्टी येथे १९  ते २३  फेब्रुवारी२०२६  या कालावधीत होणाऱ्या डॉ. स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची निमंत्रण पत्रिका राज्याचे कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अजयदादा धोंडे यांच्या हस्ते देण्यात आली तसेच याप्रसंगी कृषी प्रदर्शनाच्या पोस्टरचे अधिकृत प्रकाशनही करण्यात आले, मी कृषी प्रदर्शनाच्या  कार्यक्रमास उपस्थित राहील  असे आश्वासन ना. दत्तात्रय भरणे यांनी अजयदादा धोंडे यांना दिले. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील ना. भरणे यांच्या निवासस्थानी युवा नेते श्रीराज भरणे, कृषी प्रदर्शनाचे

इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रमुख अजय वाबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

     याबाबत अधिक माहिती अशी की, आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व शेतकऱ्यांचे नेते भीमराव धोंडे यांच्या संकल्पनेतून यावर्षी तिसरे डॉ. स्वामीनाथन 

राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आष्टी येथे संपन्न होत आहे.  कृषी विकासातून समृध्दीकडे, एक पाऊल आधुनिक शेतीकडे ही संकल्पना घेऊन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यापुर्वीही दोन वेळा भव्यदिव्य असे प्रदर्शन आष्टी येथे झाले होते. ग्रामीण भागातील सर्वच शेतकऱ्यांना पुणे, नाशिक, बारामती अशा ठिकाणी दुरवर होणाऱ्या प्रदर्शनासाठी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जाण असलेले नेते म्हणून ओळख असलेल्या माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आष्टी सारख्या ग्रामीण भागात या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. 

जेणेकरून सर्व सामान्य व आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी देखील या प्रदर्शनाचा लाभ घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न करील. 

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व‌ ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत मागील प्रदर्शनाचे उद्घाटन झाले होते. आष्टी येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयासमोरच्या भव्य प्रांगणात हे प्रदर्शन होत असुन त्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. प्रदर्शनामध्ये खते, औषधे, बि-बियाणे, औजारे

यंत्रसामग्री, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंटस, सिंचन, फलोत्पादन

पॅकेजिंग, साठवणूक, शासकीय विभाग, ॲक्वाकल्चर अशा विविध कंपन्यां आणि सहकारी संस्था सहभागी होणार आहेत. 

बायोटॅक्नॉलॉजी,टिश्यु कल्चर

पाणी व्यवस्थापन,ऑटोफर्मिग टेक्नोलॉजीं,सौर ऊर्जा,पशुखाद्य व औषधे,डेअरी इक्विपमेंट, पोल्ट्री सोल्युशन, कृषी अर्थसहाय्य, कृषि साहित्य, नियतकालिके अशा स्वरूपातून शेतकऱ्यांना भरपुर माहिती प्रदर्शनातून मिळणार आहे असे कृषी प्रदर्शनाच्या वाबळे इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रमुख अजय वाबळे यांनी सांगितले. २०० हुन अधिक कंपन्यां या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. यापूर्वी दोन्हीही झालेल्या कृषी प्रदर्शनाची इव्हेंट मॅनेजमेंट पेक्षा अत्यंत अनुभवी आणि नियोजन पद्धतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करणाऱ्या वाबळे इव्हेंट मॅनेजमेंट  यांच्याकडे या कृषी प्रदर्शनाचे मॅनेजमेंट देण्यात आले आहे.  आनंद चॅरिटेबल संस्था, आष्टी संचलित श्री. छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर कृषी महाविद्यालय, आष्टी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी संलग्न आनंद शैक्षणिक संकुल यांच्या वतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 


 

या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे चायनीज बोकड, सर्वात कमी उंचीची म्हैस तसेच शेतकऱ्यांना हेलिकॉप्टर सवारी  याचे नियोजन करण्यात येणार आहे.


* यापूर्वी महाराष्ट्र राज्यात आम्ही २५ कृषी प्रदर्शनाचे नियोजन केलेले आहे आष्टी येथे होणारे हे २६ वे प्रदर्शन असल्याचे वाबळे इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रमुख अजय वाबळे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.