आमदार सुरेश आन्ना धस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत तपासणी व उपचार शिबिर

 आमदार सुरेश आन्ना धस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत तपासणी व उपचार शिबिर



धानोरा (ता. आष्टी) – मराठवाडा भूषण लोकनेते आमदार मा. श्री. सुरेश आन्ना धस यांच्या वाढदिवसानिमित्त साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या वतीने भव्य मोफत तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत धानोरा येथील मारूती मंदिर सभागृहात होणार आहे.

या शिबिरात हृदयरोग, सांधेदुखी, मेंदू-मणका, मोतीबिंदू, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे आजार, फिट येणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार आदी आजारांची मोफत तपासणी व सल्ला दिला जाणार आहे.

शिबिराचे उद्घाटन सौ.प्राजक्ताई सुरेश धस (संचालक, महानंद दूध संघ, मुंबई) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. साहेबराव दरेकर (नाना) हे असणार आहेत.

यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये मा. परमेश्वर (काका) शेळके, मा. अंकुशराव चव्हाण, मा. विजयकुमार बांदल, मा. कांतीलाल चानोदिया, मा. शरद (भाऊ) पवार यांचा समावेश आहे.

शिबिरात डॉ. संतोष गीते, डॉ. अब्बास मोऐयादी, डॉ. गणेश गीते, डॉ. सौ. विजयश्री तोंडे-गीते हे तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत. आवश्यक रुग्णांवर पुढील उपचार व ऑपरेशन साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत.

या शिबिराचे आयोजन मा. शिरीषभाऊ थोरवे (सामाजिक कार्यकर्ते, धानोरा)व मित्रमंडळ यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत धानोरा,सुरेश आण्णा धस मित्र मंडळ व श्री स्वामी समर्थ पतसंस्था यांच्या सहकार्याने करण्यात आले असून गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.