*दोस्ती फाउंडेशनचा लोककला स्मृतीगौरव राज्यस्तरीय पुरस्कार कथालेखक श्री बाळासाहेब देशमुख यांना जाहीर*
अहिल्यानगर :- दोस्ती फाउंडेशन अहिल्यानगरतर्फे विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना दोस्ती फाउंडेशनचा लोक कलावंत पै.मजनूभाई शेख स्मृतीगौरव कथालेखक पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष मान.रज्जाक शेख सुप्रसिद्ध गझलकार, व सचिव आनंदा साळवे यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
सदर समारंभ ३१ जानेवारी 2026 रोजी शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर, येथे होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. महावीरसिंग चौहान ज्येष्ठ साहित्यिक तथा प्रा.महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, प्रमुख अतिथी राणीताई सोनवणे उपविभागीय प्रादेशिक अधिकारी (आरटीओ) श्रीरामपूर यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण , संदीप बोरकर प्रदेश अध्यक्ष दिव्यांग लोककलावंत न्याय हक्क संघर्ष समिती हे उद्घाटक आहेत. श्री.सुभाष सोनवणे जेष्ठ साहित्यिक, पोलीस अधिकारी , डॉ.सलीम शेख बैतुशिपा फाउंडेशन ,यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रम होत आहे..
श्री बाळासाहेब देशमुख यांचा पहिला कथासंग्रह 'रंग माझा वेगळा' प्रसिद्ध झाला आहे. दुसरा कथासंग्रह 'माणसं .. अशी अन् तशीही..'
1 एप्रिल 26 रोजी, सातारा येथे प्रकाशन होणार आहे.
बाळासाहेब देशमुख यांचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी कथाकथन प्रयोग होत असतात. महाराष्ट्रातील 25 जिल्ह्यांमध्ये राज्यस्तरीय साहित्य संमेलन मध्ये,त्यांचे कथाकथन कार्यक्रम झालेले आहेत.
या पुरस्काराबद्दल साहित्यिक, वाचकाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.


stay connected