नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार यांचा पद्ग्रहण संपन्न लोहावासियांची आम्हालाच साथ- नगराध्यक्ष व टीम चागले काम करेल -आ. प्रतापराव पाटील चिखलीकर

 नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार यांचा पद्ग्रहण संपन्न
 लोहावासियांची आम्हालाच साथ- नगराध्यक्ष व टीम चागले काम करेल  -आ. प्रतापराव पाटील चिखलीकर






घरकुल लाभार्थी बचत गटाच्या निधी 
आ प्रतापराच्या हस्ते वाटप
आई वडिलांच्या हस्ते फीत कापून नगराध्यक्ष यांनी घेतला पदभार,पहिल्याच दिवसापासून कामाला सुरुवात 

लोहा:-चंद्रकानत वाघमारे 


 लोहा नगर पालिका निवडणूकीत जनतेनी धनशक्तीचा पराभव करत जनशक्तीला निवडून दिले .शहरवासीयांना जे जे आश्वासन दिले ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार व टीम।यांच्या कार्यकाळात पूर्ण होणार आहे .दिल्लीच्या नेत्यांनी लोह्याच्या गल्लीत नगर पालिकेसाठी प्रचार केला पण लोहा वासीयांनी आम्हाला नेहमीप्रमाणे साथ दिली हे सहकार्य आम्ही कधीच विसरणार नाहीत येत्या काळात शहर स्वच्छ सुंदर व हरित आणि पारदर्शी प्रशासन  करू असा विश्वास आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला 



आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत लोहा नगराध्यक्ष शरद पवार यांचा पदग्रहण सोहळा संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा.खा.श्री.सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहा नगरपरिषद निवडणुकीमध्ये आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले नगराध्यक्ष शरद नामदेवराव पवार यांचा पदग्रहण सोहळा नगर परिषद, लोहा येथे पार पडला.


पदग्रहण सोहळा पार पडण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन , जुना लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज,याच्या पुतळ्यास अभिषेक करण्यात आला त्यानंतर वाजतगाजत फटाक्यांची आतिषबाजी फुलांची उधळण करत करत मुख्य रस्त्याने घोड्यावर बसून भव्य दिव्य मिरवणूक नगर पालिकेत गेली तेथे 

 महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले 


नांदेड शहर  जिल्हाध्यक्ष  माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे, माजी आमदार सुभाषराव साबणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर,  जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर,  संघटन चिटणीस मुक्तेश्वर धोंडगे,  प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, सचिन पाटील चिखलीकर,  मुख्य अधिकारी श्रीकांत लाळगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम,  माणिकराव मुकादम, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम  छत्रपती धुतमल  दत्ता वाले, मन्नान चौधरी  गणेशराव सावळे, कंधार माजी नगराध्यक्ष  , स्वप्निल पाटील लुंगारे, माजी जि प सदस्य  हंसराज पाटील बोरगावकर, आनंदराव पाटील शिंदे, किशनराव डफडे,माजी सभापती आनंदराव शिंदे ,, खुशाल पाटील पांगरीकर, शंकरराव ढगे परमेश्वर मुरकुटे, मारुती एजगे ,रमेश माळी  अर्जुन राठोड,  चंद्रमुनी मस्के, केशवराव मुकदम, गटनेते भास्करर पवार यांच्यासह  सर्व नगरसेवक व मान्यवर   उपस्थिती होते


 जुन्या शहरातुन वाजतगाजत फटक्याची आतिषबाजी करत भव्यदिव्य नगराध्यक्ष शरद पवार  यांचा पद्ग्रहण सोहळा मिरवणूक निघाली. अभूतपूर्व उत्साह व जोश होता. नगर पालिका प्रांगणात सत्कार व पद्ग्रहण सोहळा पार पडला  आमदार प्रतापराव पाटील यांनी लोहा वासीयांच्याआभार मानले .पैशाची गुर्मी करणाऱ्यांना तुम्ही धडा शिकविला शरद पाटील व नगरसेवक हे चागले काम करतील यात शंका नाही दिल्लीतील नेत्यानी गल्लीत सभा घेतल्या व या जनतेनी आम्हालाच साथ दिली याचे चिंतन यांनी करावे असे नाव न घेता माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना टोला लगावला शहर स्वच्छ सुंदर व हरित करण्याचा व सर्वाना घरपोच शुद्ध पाणी देण्यास कटिबद्ध आहोत असे सांगून त्यांनी शहरवासीयांचे ऋण व्यक्त केले

   नवनिर्वाचित शरद पवार यांनी मागील नगराध्यक्ष याच्या एकाधिकारशाही कारभाराचा समाचार घेतला व गावाची नगर पालिका आहे हा विश्वास जनतेत निर्माण करण्याचे आश्वासन दिले .प्रास्ताविक गटनेते भास्कर पवार यांनी केले .संचलन विक्रम कदम यांनी तर आभार नगरसेवक तुकाराम दाढेल यांनी केले



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.