आष्टी मतदारसंघातील रोजगार हमीची कामे सुरळीत सुरू होणार..
विरोधकांनी स्टंटबाजी करू नये.. - आ.सुरेश धस
************************
**********************
आष्टी ( प्रतिनिधी )
आष्टी पाटोदा आणि शिरूर (कासार) तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत मंजूर झालेली वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे लवकरच सुरळीत होणार आहेत दि.31 मार्च पर्यंतच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीची प्रलंबित कामे करावयाची असून अपूर्ण कामांना प्राधान्याने पूर्ण केल्यानंतरच नवीन कामांना सुरुवात करण्यात येणार आहे त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांनी कामे पूर्ण करून ही निधी अप्राप्त असेल त्या लाभार्थ्यांचे कामाची पाहणी करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले असून या कामाची खात्री करून लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यात येणार आहे दि.1एप्रिल 2026 पासून विकसितभारत- जी राम जी योजनेअंतर्गत कामांना सुरुवात होणार आहे.. आष्टी पाटोदा आणि शिरूर (कासार) तालुक्यातील सर्व प्रलंबित कामे सुरू होऊन मजुरांना रोजगार उपलब्ध होणार आहेच आम्ही लाभार्थी शेतकरी आणि मजुरांच्या रोजगाराची संपूर्ण व्यवस्था केली असल्यामुळे विरोधकांनी आंदोलन करण्याची भाषा करून स्टंटबाजी करू नये असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मध्यंतरी आष्टी पाटोदा आणि शिरूर पंचायत समिती आणि तहसील कार्यालयामध्ये रोजगार हमी योजने विषयक आढावा बैठका घेऊन संपूर्ण योजनेविषयी ची माहिती घेतली आहे जुनी भरमसाठ कामे मंजूर आहेत त्यातील अनेक नियम बाह्य आहेत ही नियमबाह्य कामे रद्द करून नियमानुसार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणे आवश्यक असल्यामुळे नियमानुसार असलेली अपूर्ण कामे अगोदर प्राधान्याने पूर्ण करावे याची असून सर्व कामांना सुरुवात करण्यात येणार आहे प्राधान्याने ज्या कामांचे एक मास्टर भरले आहे ते अगोदर सुरुवात करून त्यानंतर ज्याचे दोन-तीन मस्टर भरले आहेत ती कामे पूर्ण करण्यात येणार आहेत ही कामे पूर्ण झाल्यानंतरच नवीन कामांना सुरुवात करण्यात येणार आहे संबंधित यंत्रणेतील रोजगार सेवक पीटीओ तांत्रिक अधिकारी या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही लाभार्थ्याला आर्थिक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही त्यांची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात येईल असा इशारा देऊन लाभार्थ्यांनी अशी मागणी झाल्यास तात्काळ माहिती द्यावी असेही ते म्हणाले .
रोजगार हमी योजनेतील महत्त्वाचा घटक असलेला रोजगार सेवक हा सरपंचापेक्षा मोठा समजायला लागलेला असून द्वितीय रोजगार सेवकाचे आयडी पासवर्ड मस्टर हजेरी येथील विसंगती दिसून आली आहे त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर काम मागणी अर्ज ऑनलाईन मस्टर वेज लिस्ट आणि ऍक्टिव्ह प्रक्रिया सुसूत्रपणे राबवण्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले असून अनुसूचित जाती जमाती बचत गट आणि विधवा महिलांसाठी शेळी पालन शेड उभारणी ही कामे देखील प्राधान्याने करण्यात येणार आहेत नव्याने विरोधक निर्माण झालेले मजूरांच्या रोजगारासाठी आंदोलनाची भाषा करत आहेत ही स्टंटबाजी करण्याची आवश्यकता राहिलेली नसून सर्व कामे सुरळीत लवकरच होणार आहेत हे माहिती झाल्यामुळेच आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे असे असेही त्यांनी शेवटी म्हटले


stay connected