मराठा समाजाच्या मुंबई मोर्चात सहभागी व्हावे - सुनील नाथ

 मराठा समाजाच्या मुंबई मोर्चात सहभागी व्हावे - सुनील नाथ 



-------------------------

कडा / वार्ताहर 

------------------

मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि. 29 ऑगस्ट रोजी मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघणार असून, या आरक्षण मोर्चात मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील नाथ यांनी केले.


मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत मैदानात उतरून चलो मुंबईची हाक दिली. त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी मराठा बांधवांनी मुंबई मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन तालुकाध्यक्ष नाथ यांनी केले आहे.

--------%%------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.