फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष सचिन रानडे, उपाध्यक्ष सागर ढोले
---------------------
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांची निवड
--------------------
कडा / वार्ताहर
-------------------
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त तालुक्यातील फोटोग्राफर असोसिएशन पदाधिकारी निवडीची वार्षिक बैठक संपन्न झाली. या बैठकीत अध्यक्ष म्हणून सचिन रानडे तर उपाध्यक्षपदी सागर ढोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आष्टी येथील फोटोग्राफर सचिन रानडे यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली. कड्यातील सागर ढोले यांची उपाध्यक्ष, अशोक राऊत यांची सचिव, संतोष सायकड यांची कोषाध्यक्ष तर राजू करांडे यांची खजिनदार म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
---------%%-------
stay connected