जी. प.पिंपळा केंद्रप्रमुख श्री. बाळासाहेब बोढरे सर यांचा सेवापूर्ती निमित्त गुणगौरव सोहळा.

 जी. प.पिंपळा केंद्रप्रमुख श्री. बाळासाहेब बोढरे सर यांचा सेवापूर्ती  निमित्त गुणगौरव सोहळा. 




ह भ प श्री बाळासाहेब बोढरे सर यांनी रंजल्या गांजल्या समाजातील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविले.. ह भ प रामदास महाराज रक्ताटे.

बाळासाहेब बोढरे सर हे लोणी गावातील वारकरी संप्रदायातील एक गुणवान कीर्तनकार आणि आदर्श शिक्षक म्हणून जगले..

 माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांनीही कार्यक्रम स्थळी उपस्थित राहून सरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. 

लोणी स. तालुका आष्टी येथील आदर्श शिक्षक तथा पिंपळा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ह भ प बाळासाहेब बोढरे सर आज वयाच्या 58 व्या वर्षी निवृत्त झाले .

बीड जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी अविरतपणे 37 वर्ष शिक्षक म्हणून सेवा केली. 

श्री बोढरे सर यांनी गेवराई, पिंपळा, लोणी, कानडी, मेहेत्रे ,वस्ती अशा वेगवेगळ्या शाळांमधून विद्यार्थ्यांना अध्ययन केले.

गेली 30 वर्ष त्यांनी प्रत्येक महिन्याची पंढरपूर वारी अविरतपणे केलेली आहे.

शालेय अध्ययना बरोबरच ह भ प बाळासाहेब बोढरे सर हे एक उत्कृष्ट कीर्तनकार सुद्धा आहेत. 

दररोज भजन आणि नाम संकीर्तन ईश्वर भक्तीमध्ये ते रममान झालेले असतात.

आज लोणी येथील वाळके वस्ती शाळा या ठिकाणी पिंपळा केंद्रातील सर्व शिक्षक बांधवांच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी श्रीयुक्त सुधाकर यादव साहेब व ह भ प राऊत महाराज पिंपळेकर हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प रामदास महाराज रक्ताटे हे होते. 

याप्रसंगी आपल्या भाषणामध्ये यादव साहेब म्हणाले की मागील अनेक वर्ष आष्टी तालुका गटशिक्षण अधिकारी म्हणून काम करताना बाळासाहेब बोढरे सर यांच्याशी माझे मैत्रीपूर्ण संबंध राहिले.

 आदिवासी विद्यार्थ्यांचा पट जास्त असणाऱ्या शाळेमध्ये काम करताना त्यांनी निसंकोचपणे, तळमळीने त्या विद्यार्थ्यांचे जीवन फुलविण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज त्यांचे अनेक विद्यार्थी शासकीय पातळीवर मोठ मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत. 

धर्मभूषण राऊत दादा यांनी पिंपळा येथे सरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना  अनेक शाळाबाह्य विद्यार्थ्यांना दररोज त्यांच्या घरी जाऊन घेऊन यायचे व  शिक्षण देण्याचे प्रामाणिक काम करायचे असे गौरव उद्गार काढले . राहिलेले पुढील आयुष्य परमार्थासाठी त्यांनी व्यतीत करावे अशा शुभेच्छा त्यांना दिल्या. याप्रसंगी पं. स. सदस्य डॉक्टर सुभाष वाळके, मा. उपसभापती गोपाळभाऊ रक्ताटे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन श्री मारुती पठाडे सर मा.चेअरमन सुरेश पवार सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक सोमनाथ वाळके सर यांनीही भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांनी सुद्धा आपल्या धावत्या भेटीमध्ये सरांना उर्वरित पुढील आयुष्यासाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. 

सत्काराला उत्तर देताना याप्रसंगी ह भ प श्री. बोढरे सर भाऊक झाले होते. अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला.

अतिशय गरिबीच्या परिस्थितीमधून लहानपणी वेलतुरी येथे शिक्षण घेऊन पुढे हलाखीच्या परिस्थितीमध्ये डीएड पूर्ण केले.  त्याकाळी आई-वडिलांनी केलेल्या कष्टामुळे मला शिक्षक होता आले. 

 सद्गुरु,माता पित्या विषयीची  ऋण भावना व्यक्त करताना सरांना अक्षरशः रडू कोसळले होते.

याप्रसंगी पिंपळा केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीने ह भ प श्री. बाळासाहेब बोढरे सर यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ह भ प अम्रीत सर महाराज यांच्या भाषणामुळे सर्व उपस्थितांच्या  भावना सद्गतीत होऊन अक्षरशा डोळ्यातून अश्रू ओघळताना दिसून आले.




याप्रसंगी स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक श्री विठ्ठल शिंदे, संचालक श्री संजय कवडे सर, मोरे सर,  मुख्याध्यापक शिरसाट सर लोणी, बाबा महाराज वाळके, मा.सरपंच बाजीराव वाळके,शिवाजी पाटील वाळके, पत्रकार राजेंद्र आबा वाळके, दादा विधाते, संजय खटके, राम सरोदे सर यांनी अनुमोदन दिले तर अध्यक्षीय सूचना अशोक सासवडे सर यांनी मांडली. याप्रसंगी पिंपळा केंद्रातील सर्व शिक्षक बंधू श्री शेंडगे सर केंद्रीय मुख्याध्यापक श्री गाडे सर, विलास मोरे सर केंद्रीय मुख्याध्यापक ,पाठक मॅडम, गायकवाड मॅडम, पठाण मॅडम, श्रीमती मिसाळ मॅडम, काकडे मॅडम आदी सर्व शिक्षक कार्यक्रम साठी आवर्जून उपस्थित होते.

 आष्टी तालुका  गटशिक्षणाधिकारी सौ सीमा काळे मॅडम या काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नाहीत परंतु त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बबन वाळके सर यांनी केले तर सूत्र संचलन हनुमान पोकळे सर यांनी केले त्याचप्रमाणे सर्व उपस्थितांचे आभार श्री अशोक गांगर्डे सर यांनी मांनले.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.