बीड जिल्ह्याचे भूषण आष्टी तालुक्यातील कुंबेफळ येथील जेष्ठ कवी गायक भिमराव अर्जुन काळे/(कालेनंद) काळाच्या पडद्याआड....

 बीड जिल्ह्याचे भूषण आष्टी तालुक्यातील कुंबेफळ येथील जेष्ठ कवी गायक भिमराव अर्जुन काळे/(कालेनंद) काळाच्या पडद्याआड....







 महामानवाचे विचार घराघरात पोहोचवनारे जेष्ठ कवी लेखक भिमराव अर्जुन काळे/ कालेनंद,    आष्टी तालुक्यातील कुंबेफळ येथील - मा.पोलिस पाटील श्री विष्णू अर्जुन काळे यांचे थोरले बंधू व माझे थोरले चुलते- जेष्ठ कवी, लेखक, गायक - भिमराव अर्जुन काळे/(कालेनंद) हे मुळ जन्मगाव कुंबेफळ येथील पण गावाकडे पाऊस पाणी टाईमावर येत नसल्याने शेतीत काही पिकेना परवडेना खर्चायची ताणाताण अशा हलाखीच्या परिस्थितीमुळे भिमराव काळे/(कालेनंद) यांनी मनाशी पक्का निश्चय केला कि इकडे गावाकडे काही नाही मग त्यांनी ठरवले मग ते १९७२ साली कामाच्या उद्देशाने कल्याण येथे जाऊन (मोहने) येथे NRC नावाची इंटरनॅशनल कपड्याचा धागा तयार होतो त्या कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली. तीथे त्यांनी २७ वर्षे नोकरी केली, कंपनीच्या कामाबरोबर आंबेडकर शाहू फुले यांचे विचार समाजहित जोपासण्यासाठी वेगवेगळ्या गीत रचना करत करत लिखाण सातत्याने चालू ठेवले,मग पुढे बघता बघता त्यांच गीत रचना व लिखाण एवढ नावारूपाला आल की त्याचे, काही गीते अजरामर ठरली.


१) माझ्या भिमाच्या नावाचं कुंकू लावील रमानं २)६ डिसेंबर ५६ साली वेळ कशी ती हेरली.३) मी जगेन तरी या समाजासाठी, मी मरेन तरी या समाजासाठी,  अशे काही गीते अजरामर झाली.... त्यांनी लिहिलेल्या गिताचे - महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक स्व.प्रल्हाद शिंदे व त्यांचे मुलं आनंद- मिलिंद शिंदे, व सुषमादेवी शिंदे रंजना शिंदे यांनी गायली. भिमराव काळे/(कालेनंद) यांचे काही गीते महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरही काही राज्यांमध्ये सुप्रसिद्ध झाली....कला क्षेत्रात मिळालेली पुरस्कार - २००८ ला मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते कला भुषण पुरस्कार मिळाला,२०१७ ला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद - पुणे, ठाणे जिल्ह्या शाखेच्या वतीने उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार, २०१७ ला अखिल भारतीय मातंग संघ , मानखुर्द - मुंबई यांच्याकडून समाज भूषण पुरस्कार, २०१८ मध्ये बहुजन राष्ट् समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब , आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार, दिनांक ३१-२-२०२३रोजी कवी वामनदादा कर्डक जिवन गौरव पुरस्कार,व इतर लहान - मोठे अनेक पुरस्काराने, चुलते- भिमराव काळे/(कालेनंद) यांचा एक जेष्ठ कवी , लेखक, गायक म्हणून सन्मान झाला.  त्याची गीते टी सिरीज,विनस ,प्रीझम, कश्मिरा इ. कॅसेट कंपनीच्या वतीने त्यांनी लिहिलेल्या गितांची प्रसिद्धी झाली..... भिमराव अर्जुन काळे/(कालेनंद)दादा कुबेफळकर हे माझे सख्खे थोरले चुलते होते. दिनांक २२-६-२०२५ रोजी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले (मृत्यू समयी त्याचे वय ७८ वर्षे होते) दिनांक- २९-६-२०२५ रोजी जलदान (दशक्रिया) विधीचा कार्यक्रम झाला त्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनीच लिहिलेल्या गीतांनी महाराष्ट्राचे प्रसिद्ध ख्यातनाम गायक आनंद -मिलिंद व सुषमादेवी शिंदे व इतर अनेक कलाकार गायकांनी दिली गीतातून, जेष्ठ कवी लेखक गायक भिमराव अर्जुन काळे/(कालेनंद) दादा कुंबेफळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली......

🌸शेवटी कालेनंदाचा पुतण्या या नात्याने जाता जाता एक खंत व्यक्त करू इच्छितो.... माझ्या चुलत्याने लिहिलेले गाणे गाता गाता अनेक दिग्गज कलाकार गायक मोठे होताना मी माझ्या कानाने ऐकले.... पण त्या गाण्याची रचना आणि लिखाण करणारे सरळ स्वभावाचे चुलते माझे कायम पडद्याआडच राहिले.... कायम पडद्याआडच राहिले....नव्हता कशाचा गर्व आणि अभिमान कालेनंदाला....नेहमी समाज हितासाठीच मोकळ्या मनानं लिखाण करीत राहिले.... नव्हता गर्व आणि अभिमान कशाचा शेवटपर्यंत चुलते माझे समाजासाठीच लिखाण करीत राहिले.... आणि जाता जाता, मी जगेन तरी या समाजासाठी आणि ,मी मरेन तरी या समाजासाठी,हे गीत समाजाच्या काळजावर कोरुनच गेले.... चुलते माझे पडद्याआडच राहिले... माझ्या चुलत्यांच्या जिवावर अनेक प्रसिद्ध दिग्गज कलाकार गायक मंडळी मोठी होताना मी पाहिले...पण चुलते माझे सरळ साध्या स्वभावाचे कायम पडद्याआडच राहिले..... पडद्याआडच,राहिले...... 

✍️दादा विष्णू काळे (कुंबेफळ)



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.