*क्रांतिकारी विचार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे.....!*
*"शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा फक्त दहा दिवस वाघ म्हणून जगा"*
*आपल्या आयुष्यात जगण्यात अलग वाघाचा दरारा असला पाहिजे, कुणाचे गुलाम म्हणून जगू नका, गुलामीत दिलेली खैरात नरक यातना देते आणि स्वतंत्र्यात संपादन केलेली गरिबी पण स्वर्ग सुख देते. त्यामुळे जास्त खूप मोठ आयुष्य जगला यापेक्शा परोपकारी, सत्यवादी, नियतीने किती जगला याला महत्व असते. त्यामुळे शेळी होऊन शंभर दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन दहाच दिवस जगा कारण वाघ वाघ असतो.महामानव डॉ बाबासाहेबानी दिलेलं आरक्षणाचं एक पद व्यापून नुसता सही पुरता गुलाम बनवलेला खासदार, आमदार, मंत्री, जीप सदस्य, पंस सदस्य, सरपंच, ग्राम सदस्य काहीच कामाचा नसतो....!तो फक्त कटपुटली असू शकतो त्याचा रिमोट कुणाच्या तरी हाती असणार, कारण कुणाच्या सावलीखाली राहून स्वतःच अस्तित्व निर्माण करता येत नसत त्याला स्वतः उन्हाच्या झळया सहन कराव्या लागतात. सन्माननीय नाना पाटेकर साहेब खालील व्हिडीओत परखड सत्य आणि निर्भीडपणे सत्य बाजू समोर मांडतात, भ्रष्टाचारावर समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतानाही तोंडावर खरं बोलतात, कारण खरं बोलायला लागते ती हिम्मत. जी गुलामत कधीच नसते, निर्भीड लोक कधीच खोटं बोलत नाहीत आणि खोटं बोलणारी गुलाम कधीच निर्भीड बनत नाही.निर्भीड सत्यवादी नाना पाटेकर तुम्हाला सलाम.....गुलामी करून बूट चाटून मिळवलेली पद, पदवी, भूषण काहीच कामाचं नसतं तो कायम गुलाम असतो. एक मोठा अभिनेता आहे ज्याला पद्मभूषण पुरस्कार प्राप्त आहे पण गुलाम आहे मराठी भाषा वापरून मराठी अभिनेता झाला नावा रुपाला आला पण मराठी भाषा बोलावी यावरून चकार शब्दही पत्रकाराला बोलला नाही. थू असल्या पुरस्कारापुरत्या गुलामावर....त्यामुळे गुलामी सोडा सत्य सरळ खरं वागा नियतीने वागा, निसर्ग तुमच्या सोबत असेल.आम्ही हे यासाठी सांगतोय की बाबासाहेब नेहमी म्हणायचे गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड पुकारून दंड थोपटणार नाही....आजकाल गुलामी समजायला वेळ लागतो एखाद्याला सोन्याची साखळदण्ड आणि हातकड्या घातल्या म्हणजे तो स्वतःला धन्य मानतो.अरे बाबा ते असे नाही कारण गुलामीचे साखळदण्ड आणि हातकड्या जरी सोन्याचे असल्या किंवा लोखंडाच्या असल्या तरी त्यात शंभर टक्के गुलामीची बंदी आहे.त्यामुळे गुलामी सोडा. अन्याय, अत्याचार, असामानता, जातीयवाद, धर्मवाद याला कडवा विरोध करा.आपण पंचेविसाव्या शतकात आहोत. अजूनही कुणाची तरी गुलामी करत असू तर मेलेलं बर......इतकंच ...... मा सम्राट डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर-9922541030*
stay connected