खडतर परिस्थितीवर मात करत उभारला स्वताचा कारखाना!
गणेश मुर्तीच्या माध्यमातून अहिल्यानगरच्या नजन कुटुंबाची ओळख
आष्टी- वयाच्या अघव्या बारा वर्षांपासून गणेश मुर्तीचा छंद जोपासला,अनेक व्यावसायिकांकडे काम केले.घरची परस्थिती हालखीची असल्याने मनात इच्छा असताना देखील स्वताचा व्यवसाय उभा करता येत नव्हता,पत्नी व तीन लेकरांना हाताशी धरून उसनवारी व बॅकेचे लोन काढून स्वताचा व्यवसाय उभा केला.अन् अल्पवधीत अहिल्यानगर जिल्ह्यात नजन कुटुंबाने गणेश मुर्तीच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे.अश्या जिगरबाज अनिल नजन याची यशोगाधा...
अहिल्यानगर शहरातील बोल्हेगांव येथील अनिल प्रभाकर नजन यांना लहानपणापासून गणेश मुर्ती बनवण्याचा छंद होता.हा छंद पुर्ण करण्यासाठी त्यांनी अनेकांच्या गणेश मुर्तीच्या कारखान्यात काम केले.नंतर आपण स्वताहाचा कारखाना उभारावा यासाठी धडपड सुरू केली.पण परिस्थिती हालखीची असल्याने पैसा उभा करताना अनंत अडचणीचा सामना करावा लागला.सुरवातीला काही उसनवारी पैसे जमा केले.पण त्यातही पडतळ बसत नसल्याने बॅकेचे लोन घेतले.आणि अहिल्यानगर शहरातील शिवाजीनगर येथे किरायाच्या जागेत गणेश मुर्ती बनवण्याचा कारखाना सुरू केला.यासाठी पत्नी उषा,मुलगी अनिषा,तनिष्का,मुलगा शिवांश याच्या मदतीने हा व्यवसाय सुरू आहे.आज आठ वर्षांपासून हा व्यवसाय स्वताच्या बळावर सुरू असून यासाठी कलरच्या गोण्या,भाडे,शाडू,यासह विविध साहित्यांसाठी वार्षिक तीन ते चार लाखांचा खर्च होतो.यातून वर्षाकाठी खर्च वजा होता अडीज तीन लाख रूपये हाती येतात.ही गणेशमुर्ती अहिल्यानगर, बीड,नाशिक, पुणे यासह अनेक शहरात विक्रीसाठी जाते.७० रुपयापासून तीन हजार रूपयापर्यत किंमती आहेत.
stay connected