शेख आरिफ भाई यांच्याकडून सवारीला चादर अर्पण

शेख आरिफ भाई यांच्याकडून सवारीला चादर अर्पण



 अहिल्या नगर  दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भूमी अभिलेख कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्याकडून कोटला मैदान येथील हसन हुसेन रजी. यांच्या दोन्ही सवारीवर आरिफ भाई शेख जिल्हा अध्यक्ष भूमी अभिलेख कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्या हस्ते फुलाची चादर अर्पण करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष एन.एम. पवळे सर आणि केंद्रीय उपअध्यक्ष वसंत थोरात सर विभागीय अध्यक्ष ना.म. साठे आणि जिल्हा अध्यक्ष के.के. जाधव आदी मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित होते गोल्डन ग्रुप महाराष्ट्र राज्य अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाअध्यक्ष रमीज शेख नाशिकचे जिल्हाअध्यक्ष दिलावर मणियार आणि जळगावचे जिल्हाअध्यक्ष मुक्तार भाई सरदार आणि पुण्याचे जिल्हाअध्यक्ष इरफान शेख आणि औरंगाबादचे जिल्हाअध्यक्ष रहीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते खूप उत्साहात सदरचे कार्यक्रम संपन्न झालेले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.