यात्रा- जत्रा म्हणजे सामाजिक सलोखा जपण्याचे माध्यम -: तहसीलदार सौ. वैशाली पाटील
कडा ( वार्ताहर):- यात्रा जत्रांच्या निमित्ताने गाव व परिसरातील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ एकत्रित येतात, त्यामुळे सामाजिक सलोखा जपण्याचे महत्वाचे काम होते असे मत आष्टीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी व्यक्त केले.
आष्टी तालुक्यातील नांदा येथील जागृत म्हसोबा देवस्थानच्या यात्रा निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते तथा किसान मोर्चाचे आष्टी तालुका अध्यक्ष बबनराव औटे यांच्या साई तारा निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
यानिमित्ताने आष्टीच्या दंडाधिकारी तथा तहसीलदार सौ. वैशाली पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना सौ. पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागात सर्व जाती धर्माचे लोक यात्रा जत्रांच्या निमित्ताने एकत्रित उत्सव साजरा करतात. त्यातून सामाजिक सलोखा तसेच गाठीभेटी तसेच विचारांची देवाणघेवाण होते. जागृत देवस्थान म्हसोबाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. छबिना पालखी मिरवणूक, गोंधळी कला, फटाक्यांची आतिषबाजी, ढोल, लेझीम, झांजरी पथक यांच्या तालात यात्रा उत्सव संपन्न झाला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस नेते बापूसाहेब डोके, तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, जि.प. चे माजी सभापती उद्धव दरेकर, अहिल्या नगर येथील ज्येष्ठ उद्योजक तथा गजराज ड्रायक्लीनर्सचे चेअरमन सुरेश चव्हाण, उद्योजक चंद्रकांत गाडे, उद्योजक रमाकांत गाडे, सूर्यकांत गाडे, दिलीप गाडे , धनंजय गाडे, धामणे, ॲड. शिवजीत डोके, पी.बी.कर्डिले, प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, निंबोरे, आसाराम वाडेकर, प्रा. श्याम सांगळे, शिवाजी मोरे,
शेवगाव कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती राजेश बुधवंत,
उत्तेकर, प्रा.अविनाश भवर, दै. झुंजार नेताचे पत्रकार दिगंबर बोडखे,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर सायंबर, युवा नेते गणेश पांडूळे, उद्योजक मेघराज पांडूळे
अशोक झेंडे, संदीप बिरंगळ, प्राचार्य बोडखे, राजेंद्र भोसले, भूकन सर, ॲड. एस. के. गव्हाणे, ॲड. अभिजीत गव्हाणे इंजि. रमेश ढोबळे, डॉ . निंबोरे व इतर मान्यवर उपस्थित होते. बबनराव औटे व संदीप ओटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
stay connected