अध्यापनात नवनवीन शैक्षणिक साहित्याचा वापर करावा.- लालासाहेब मगर

 *अध्यापनात नवनवीन शैक्षणिक साहित्याचा वापर करावा.- लालासाहेब मगर.*




       अध्यापनात नवनवीन शैक्षणिक साहित्याचा वापर करावा असे मत वेळापूर येथील प्रसिद्ध व्यापारी लालासाहेब मगर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वेळापूर मुली शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोमनाथ जवंजाळ होते.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन चव्हाण यांनी केले.

     यावेळी बोलताना लालासाहेब मगर म्हणाले की, अध्ययन अध्यापन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधावा.शिक्षणावरचं देशाचे भवितव्य अवलंबून आहे.यासाठी शिक्षणाला केंद्रबिंदू मानावे, शिक्षण प्रक्रिया यशस्वी व्हावी.



     येथील शिक्षणप्रेमी प्रशांत वाघे यांनी लालासाहेब मगर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी वह्या, पेन, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी लागणारे पुस्तके याचे वाटप केले. 

     यावेळी त्यांनी संगणक कक्ष व डिजिटल बोर्ड पाहून समाधान व्यक्त केले.

   यावेळी मुख्याध्यापक युन्नूस तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण कुमार पांगे यांनी केले तर आभारप्रदर्शन महादेव घोगरे यांनी केले.

     कार्यक्रमासाठी सौ्.प्र.रा.इंगोले,श्रीम.आ.शां.जैन,कॄष्णकुमार तुपे,श्रीम.किरण घाडगे,सौ.क.सं.आवटे आदिंनी परिश्रम घेतले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.