बँकेने दाखविलं असंही सामाजिक दायित्व! शाळेला दिली सोलर ऊर्जेवर चालणाऱ्या पंख्यांची भेट

 बँकेने दाखविलं असंही सामाजिक दायित्व!
शाळेला दिली सोलर ऊर्जेवर चालणाऱ्या पंख्यांची भेट 




--------------------

 राजेंद्र जैन/ कडा 

----------------

भारतीय स्टेट बँकेच्या 70 व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला सोलर उर्जेवर चालणाऱ्या 12 पंख्यांची भेट देऊन शाखा व्यवस्थापक नवनाथ शेळकेंसह कर्मचाऱ्यांनी समाजाप्रती असलेलं सामाजिक दायित्व दाखवून दिले.


भारतीय स्टेट बँकेचा एक जुलै हा 70 वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त कडा शाखेच्या वतीने बँकेच्या ग्राहकांना पुष्पगुच्छ व मिठाई वाटून हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच आपणही समाजाचं काहीतरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला बँकेचे व्यवस्थापक नवनाथ शेळके यांच्या संकल्पनेतून सोलर उर्जेवर चालणाऱ्या 12 पंख्यांची बँकेकडून विशेष भेट शाळेचे मुख्याध्यापक पाचारणे यांना प्रदान करण्यात आली. याप्रसंगी बँकेचे व्यवस्थापक नवनाथ शेळके, प्रदीप रुपनर, शालेय व्यवस्थापन समितीचे दीपक कर्डिले इब्राहिम सय्यद, अनिल ढोबळे, नागेश कर्डीले यांच्यासह शाळेचे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. 

-------%%-------

आपणही या समाजाचं काहीतरी देणे लागतो, याच सामाजिक दायित्वाच्या भावनेतून ज्या ज्ञान मंदिरातून आपणही घडलो. त्या शाळेला बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त छोटीशी भेट देण्याचा आम्ही प्रयत्न केला.
-नवनाथ शेळके
 बँक शाखा व्यवस्थापक कडा 

-------%%------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.