यंदा माणिकदौंडी महसूल मध्ये उडीद पिकाचा भरता येणार पीक विमा. - डॉ. उध्दव घोशीर

 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾

*यंदा माणिकदौंडी महसूल मध्ये उडीद पिकाचा भरता येणार पीक विमा. - डॉ. उध्दव घोशीर*





पाथर्डी तालुक्यामधील माणिकदौंडी महसूल मध्ये सर्वाधिक उडीद पिकाचे उत्पन्न असून यावर्षीही सुमारे 90 ते 95 टक्के पेरणी झालेली आहे परंतु या ठिकाणच्या शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष पंतप्रधान पिक विमा योजनेचा उडीद या पिकासाठी लाभ घेता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये एक नाराजीचा सूर होता. या समस्येवर अनुस्पर्श फाउंडेशनने पंतप्रधान पीक विमा योजने मध्ये उडीद पिकाची माणिकदौंडी महसूल मध्ये नोंद असावी यासाठी महसूल व कृषी विभागाला वेळोवेळी निवेदनाच्या साह्याने पाठपुरावा केला. त्याकरिता  पाथर्डी - शेवगाव तालुक्याच्या आमदार मोनिकाताई राजळे तालुक्याचे तहसीलदार तसेच तालुका कृषी विभागाचे कृषी अधिकारी सुधीर शिंदे साहेब, कृषी पर्यवेक्षक मोहनसिंग राजपूत,  कृषी सहाय्यक पवनकुमार राठोड या सर्वांची मदत लाभली गेली. २४ जून २०२५ रोजच्या शासन निर्णयानुसार खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी शासनाने सुधारित आदेश जारी केला आहे यात माणिकदौंडी महसूल मध्ये उडीद या पिकाचा समावेश पीक विमा भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच नुकसान भरपाई च्या नियमात देखील बदल केल्याचे दिसून येत आल्याने हे *अनुस्पर्श फाऊंडेशनच्या मागणीचे यश असल्याचे उध्दव घोशिर यांनी म्हटले आहे.*

शासनाने यावर्षीपासून एक रुपयात पीक विमा योजना बंद केली असून शेतकऱ्यांना आता अधिकचे पैसे मोजून पीक विमा भरावा लागणार आहे, कारण मागील वर्षी झालेल्या घोटाळ्या मध्ये जमीन नावावर नसतानाही भाडेतत्त्वावर किंवा सरकारी/ देवस्थान/ ट्रस्टच्या जमिनीचे पिक विमा भरून शासनाची फसवणूक केल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यावर्षीपासून पीक विमा भरण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक  आणि  ई  पीक पाहणी बंधनकारक केलेली असून यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शासनाचे प्रयत्न दिसून येत आहेत. पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.