एम्.टेक पती आणि एम. एससी पत्नी या उच्चशिक्षित दाम्पत्यांने माळरानावर फुलवली फळबाग ! दीड एकर ड्रॅगन फ्रुटचे २० ते २५ टन उत्पादनाचा अंदाज
आष्टी ( प्रतिनिधी )
तालुक्यातील सोलापुरवाडी येथील हनुमंत यांचे शिक्षण एमटेक आणि त्यांची पत्नी कल्पना गावडे या देखील एमएससी पर्यंत शिकलेल्या आहेत पुणे येथील आयटी पार्क मध्ये दोघेही नोकरीत असताना कोविड-19 महामारीमुळे त्यांना सोलापूर वाडी या गावी परतावे लागले या तरुण उच्चशिक्षित दाम्पत्यांनी कष्ट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने खडकाळ माळरानावर शेती समृद्ध केली आहे. दुष्काळी भाग असल्याने कमी पाण्यावर येणारी, या भागातील परिस्थितीला पूरक पिकांवर अभ्यास करुन ‘ड्रॅगन फ्रुट’, चे यशस्वीपणे पीक घेत आर्थिक मजबुती करण्याचा प्रयत्न केला आहे.
सविस्तर VDO वृत्त पहा👇📽️
बीड जिल्ह्याच्या सीमेवर सोलापुरवाडी (ता. आष्टी) परिसर डोंगरपट्ट्याचा, दुष्काळी. शेतीही सर्वसाधारण प्रतीची. पाण्याचे कायम दुर्भिक्ष असल्याने सोलापुरवाडी वडिलोपार्जीत पन्नास एकर शेती. मात्र बहुतांश क्षेत्र माळरानाचे. हुलगे, मटकी यासारखी कोरडवाहु पीके घेतली जात. हनमुंत गावी आल्यावर कंपनीचे ‘वर्क फॉर्म होम’ काम सुरु ठेवले. हे काम करत असतानाच त्यांनी आपल्या उच्चशिक्षणाचा फायदा शेतीसाठीही करायचा निर्णय घेत चार वर्षापूर्वी शेती ‘डेव्हलप’ करण्याचा निर्णय घेतला.
खडकाळ माळरानाच्या जमीनीचे सपाटीकरण केले. प्रारंभी पाण्याचा प्रश्न भेसावत होता. मात्र येथील सामाजिक कार्यकर्ते शिरीष थोरवे स्वतःकडील पाणी उपलब्ध करुन दिले. त्यानंतर दोन एकरावर शेततलाव, विहीरी, विंधनविहीरी घेऊन पाणी प्रश्नावर मात करत ‘ड्रॅगन फ्रुट’, आणि सफरचंद लागवडीसारखा वेगळ्या प्रयोगासह संत्रा, सीताफळाचे यशस्वी पीक घेत माळरानावरची शेती समृद्ध केली आहे. टॅक्ट्रर चालवण्यापासून बहुतांश कामे पत्नी कल्पना करतात. त्यांना आई लंकाबाई यांची साथ मिळते. वडीलांचे सतरा वर्षापुर्वी निधन झाले. तेव्हापासून कौटूंबीक जबाबदारी हनुमंत यांच्यावर आहे.
खडकाळ, माळरानाच्या शेतीत पारंपारिक पिके घेण्यापेक्षा फळपिकांत वेगळा प्रयोग करण्याचा विचार करुन हनमुंत गावडे यांनी अभ्यास केला. त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातील ‘ड्रॅगन फ्रुट’ लागवड. तेथील पाणी, माती, तापमान, आणि बाजार व्यवस्थापन , आदीबाबतचा अभ्यास केला. सफरचंद लागवडीसंदर्भात जम्मू-काश्मिरच्या भूज, कच्छ तसेच तेलंगणा भागात जाऊन माहिती घेतली. या सर्व बाबीला वर्षाचा कालावधी गेला. ‘ड्रॅगन फ्रुट’ आणि सफरचंद लावण्याच्या त्यांनी निर्णय़ घेतला. चार वर्षापुर्वी फलटण येथून ड्रगन फ्रुटची रोपे आणून लागवड ७ बाय १० आकारात लागवड केली. एका एकरात २४०० रोपे लागली. त्यासाठी फलटण तालुक्यातून रोपे आणूली. एक एकरावर हिमाचल प्रदेशातून एचआरएम ९९, अण्णा व डोअरसेट या वाणांची ४१० रोपे आणून तीन वर्षापुर्वी सफरचंदाची १० बाय १२ आकारावर लागवड केली. सफरचंद लागवडीचा प्रयोग करणारे ते या भागातील पहिले शेतकरी आहेत. शिवाय ३ एकरावर संत्रा, २ एकरावर सिताफळांचीही लागवड केली आहे. यंदा सफरचंदात गव्हाचे आंतरपीक घेतले आहे.
ड्रॅगन फ्रुट’, सफरचंदासारखे यशस्वीपणे पीक घेताना हनुमंत गावडे आणि कल्पना गावडे वेगवेगळ्या तंत्राचा वापर करतात. त्यांनी फळझाडांना फवारणी करताना उंच झाडावरील फवारणीसाठी वापरात त्यांनी एचटीपी यंत्राचा वापराला प्राधान्य दिले आहे. या यंत्राला अधिक दाब असल्याने कमी काळात पूर्ण झाड फवारणी करताना कव्हर करता येते. अगदी अर्ध्या तासात एक एकर फवारणी करता येते. स्वतःकडे असलेल्या टॅक्ट्ररवर अत्याधूनिक फवारणी यंत्र बसवलेले आहे.
‘ड्रॅगन फ्रुट’, सफरचंद व अन्य फळझाडांच्या बागेत तणनाशक किंवा खुरपणी करत नाहीत. तणनाशकांमुळे झाडांच्या मुळावर परिणाम होते. त्यामुळे झाडांतील प्रोटीन कमी होते. कळी गळती प्रमाण वाढते. खुरपणी करण्यासाठी अधिक आर्थिक भार होते. त्यामुळे त्याएवजी ग्रास कटरचा वापर करत गवताचा भुगा करतात. त्यामुळे आर्थिक भार कमी होतोच, पण तणाचा भुगा होत असल्याने कंपोस्ट खत तयार होते. त्याचा बागेला अधिक फायदा होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
साधारण फेब्रुवारी ते मे या काळात प्रामुख्याने ड्रॅगन फ्रुटवर उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम होते. ड्रगन फ्रुटच्या झाडाच्या मुळ्या दोन प्रकारे असतात. त्यातील ७० टक्के मुळ्या जमीनीत असतात तर तीस टक्के मुळ्या हवेत मोकळ्या असतात. त्याना पारंब्या किंवा आऱ्या म्हणतात. मोकळ्या मुळ्या सकाळी-सध्याकाळी हवेतील गारवा शोषून घेतात. शिवाया उन्हाळ्यात अधित तापमान असल्यामुळे पाणी अधिक देण्याचा प्रयत्न करतो. उन्हाळा म्हणून अधिक पाणी दिले तर उन्हाळ्यातील अधिक तापमानामुळे जमीनीतील मुळ्या आहे ते सगळे पाणी खेचून घेतात. ते झाडाच्या पानात साचते. उष्णतेमुळे पानातील पाणी गरम होते आणि पान सडून गळून पडते. अशाच प्रकारे अनेक ड्रॅगन फ्रुट उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे होऊ नये म्हणून उन्हाळ्याच्या काळात आठ दिवसातून एका एकराला एक तास, म्हणजे एका झाडाला सोळा लिटर पाणी मोजून देतात. त्यामुळे सण बर्निंगमुळे नुकसान होत नाही. शिवाय क्युलीन आणि सिलीकाॅन पावडरची चार महिन्यात दोन ते तीन वेळा झाडावर फवारणी करतात. त्यामुळे झाडाच्या पानावर उष्णतेचा तीव्रता कमी करणारा थर तयार होतो. झाडाची सहजपणे उन्हाच्या तीव्रतेमुळे होणाऱ्या नुकसानापासून सुटका होते.
" सेंद्रिय खतांमुळे उत्पादनात मोठी वाढ "
पीएम बायोटेक प्रॉडक्टची खते वापरल्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली असून त्यांना सन २०२२ मध्ये ०४ टन २०२३ मध्ये १४ टन आणि यावर्षी २० ते २५ टनापर्यंत उत्पादन होणार आहे संपूर्ण सेंद्रिय खते वापरल्यामुळे या ड्रॅगन फ्रुटला वाढती मागणी असून त्याची वजन जास्त आहे आणि फळावर चकाकी येत असल्यामुळे किंमत पण जास्त मिळू शकते
- ड्रॅगनचे फळ मोठे होण्यासाठी झाडांतील खनिजे अधिक असली पाहिजे याबाबत हनुमंत गावडे यांनी अभ्यास केला आङे. त्यासाठी जिबेलिक अॅसिड पाच ग्राम व पोटॅशियम सोलाईट चार किलो हे घटक काढणीच्या आधी आठ दिवस प्रती एकरी ठिबकमधून देतात. साधारण जुन ते नोव्हेंबर असे सहा-सात महिने ड्रॅगन फळाची तोडणी केली जाते. जिबेलिक अॅसिड पाच ग्राम व पोटॅशियम सोलाईट दर तोडणीला एक मात्र देतात.
- ‘ड्रॅगन फ्रुट’, सफरचंद व अन्य फळझाडांना थेट शेणखत न देता त्याचे कंपोस्ट खत तयार करतात. नोव्हेंबरमध्ये संपुर्ण फळतोडणी झाल्यावर साधारण तीस ते पस्तीस टन शेणखत विकत घेतात. त्यात एनपीके, आॅग्रेनिक कार्बन, अॅमिनो अॅसिड असलेले जैविक खत मिसळतात. त्यानंतर चर घेऊन दहा ट्राली खत घालतात. त्यामुळे झाडांत फळ नसताना टवटवी येते, झाडा ताकदवान बनते. फुलधारणा नसताना शाखीय वाढ मोठे होते. फुल व फळधारणेचे प्रमाण दुहेरी होते. ड्रॅगन फळ अगदी एक किलोपर्यत पोसल्याचा त्यांचा अनुभव आहे.पक्षांपासून व किडमाशीपासून संरक्षण करण्यासाठी सफरचंदाला प्लास्टीक आवरण पिशव्याचा वापर करतात. संपुर्ण सिंचन पद्धतीचा वापर करताना तांत्रिक अभ्यासातून फळबागांना मोजून पाणी, ठिंबकमधूनच खते दिल्याने मोजके आवश्यक पाणी,खते जातात. फळधारणा चांगली होतेच, पण आर्थिक बचतही होत आहे.
- हनमुंत आणि कल्पना गावडे या तरुण उच्चशिक्षित दाम्पत्यांनी माळरानावर ड्रॅगन फ्रुट, सफरचंद यशस्वी केल्यानंतर आता पुन्हा दोन एकरावर लागवड करत आहेत. त्यासाठी लागणारे सिमेंटचे खांबासह अन्य लागणारे साहित्य स्वतः तयार केले आहे. बहुतांश कामे हे दाम्पत्यच करतात. फळ तोडणीच्या व अन्य अधिक गरजेच्या काळात स्थानिक पातळीवरील मजुरांची मदत घेतात.
-----------
थेट विक्री, रोपे निर्मिती
- ‘ड्रॅगन फ्रुट’, सफरचंद व अन्य फळांची बाजारातील मागणी, तेथील दराचा आढावा घेऊन स्वतः विक्री करतात. पहिल्यावर्षी सन २०२२ मध्ये ड्रॅगन फ्रुटचे ४ टन तर २०२३ मध्ये टनापर्यत उत्पादन निघाले. साधारणपणे प्रतीकिलोला ११० ते १२० रुपयांपर्यत दर मिळाला. मागणीनुसार नगर, पुणे सुरतला विक्री करतात. सफरचंदांचे दर वर्षाला सात क्विंटलपर्यत उत्पादन निघाले आहे. सफरचंदाला ७५ ते १०० रुपयांपर्यत दर मिळाला आहे. संत्रा, सीताफळाची स्थानिक बाजारात विक्री करतात हनुमंत ड्रॅगन रोपांसाठी लागणाऱ्या कटींग स्टींकचीही दर वर्षाला एकलाखापर्यत विक्री करतात. प्रती स्टीकला पंचवीस रुपयांचा दर मिळतो. आता ते स्वतःही रोपे तयार करण्याला प्राधान्य देत आहेत.
----
दोन एकराचा शेततलाव
सोलापुरवाडी शिवारात शाश्वत उपलब्धता नसल्याने पाण्याचे तसे कायम दुर्भिक्ष. हनमुंत गावडे यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गरजेनुसार २ विहीरी, दोन विंधनविहिरी खोदल्या आहेत. कृषी विभागाच्या मदतीने दोन एकर क्षेत्रात उंचवट्यावर पावणे तीन कोटी लिटर क्षमतेचा शेततलाव केला. शेतलाव उंचवट्यावर असल्याने विना विद्युतपंप थेट पाईपलाईनने पाणी सर्व फळपिकांच्या क्षेत्राला देता येते. शिवाय पाणी उपसा करायची गरज पडली तर वीज उपलब्ध असावी म्हणून सोलर युनीट बसवले आहे. त्यामुळे वीजेच्या खर्चात बचत होत आहे.
-------
stay connected