डॉ.सय्यद डेंटल क्लिनिक कडून दिंडीतील वारकऱ्यांना टूथब्रश,टूथपेस्टचे मोफत वाटप
..............................................
आष्टी प्रतिनिधी
आष्टी जि.बीड येथील डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकच्या वतीने पंढरपूर कडे प्रस्थान करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील सिंदखेडच्या मठाधिपती मेघशाम नारायण महाराज यांच्या दिंडीतील दीडशे वारकऱ्यांना दिनांक 02 जुलै 20 25 रोजी,जामगाव रोडवरील सुनील लक्ष्मण रेडेकर यांच्या वस्तीवर,टुथब्रश,टुथपेस्टचे मोफत वाटप करण्यात आले.डॉ.सय्यद डेंटल क्लिनिकचे डॉ.सय्यद हुमायुद्दीन आणि कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या विनंतीला मान देऊन लक्ष्मण बापू रेडेकर,सुनील रेडेकर,जालिंदर मच्छिंद्र पोकळे,दादासाहेब उर्फ पप्पू गर्जे,प्रा.अशोक भोगाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.डॉ.सय्यद वलीयुद्दीन अल्लाउद्दीन यांनी सर्वांच्या आभार मानले.
stay connected