आष्टीतील शासकीय कार्यालय परिसरात नो पार्किंग व हेल्मेट न लावल्याने पोलिसांनी
२४ वाहनांवर २४ हजार रुपये दंडात्मक केली कारवाई
आष्टी। प्रतिनिधी
आष्टीतील न्यायालयात व तहसिल कार्यालयाच्या परिसरात नो पार्किंग असलेल्या जागी गाड्या अस्तव्यस्त पद्धतीने उभ्या केल्यामुळे आणि शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांनी हेल्मेट न वापरल्याबद्दल पोलिसांनी २४ मोटार सायकल वाहनांवर एकुण २४ हजार रुपये दंडात्मक कारवाई केली आहे.
आष्टी शहरातील शासकीय कार्यालयात व चौका चौकात अनधिकृत पार्किंग नो पार्किंग असलेल्या ठिकाणी वाहने उभी केल्यास ती अडथळा निर्माण करतात आणि रहदारी नियमांचे उल्लंघन होते. यासाठी आष्टी पोलिसांनी सोमवार दि ३० जून रोजी सकाळी ११ ते २ वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालय परिसरात व न्यायालय परिसरात अस्ताव्यस्त वाहन लावणे व मोटार सायकल चालवताना तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालयातील कर्मचारी यांनी हेल्मेट न लावल्याने त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. एकूण २४ वाहनांवर कार्यवाही करण्यात आली व त्यांच्याकडुन २४ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे,ए एस आय मिसाळ, पोलिस शिपाई विलास गुंडाळे, पोलिस हवालदार नितीन काकडे,पोलिस शिपाई तांबे, पोलिस शिपाई वाणी यांनी कारवाई केली आहे
stay connected