सार्वजनिक बांधकाम उपविभागातील ३० वर्षाच्या सेवेनंतर अनिल कदम सेवानिवृत्त
आष्टी। प्रतिनिधी
आष्टी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात कार्यरत असलेले वरीष्ठ सहाय्यक अनिल कदम यांनी ३० वर्ष इतर कर्मचाऱ्यांना व कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांना सहकार्याची भावना ठेवत अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम केले असे प्रतिपादन उप अभियंता के एल पानसबंळ यांनी केले.
आष्टीतील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक अनिल कदम हे सोमवार दि ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रम प्रसंगी अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी एस बी सिरसाट,बीड येथील सारडा,एस बी हजारे,पी एस मुळे,बी बी गाडे,व्हि बी गाडे,पी बी काळे,एन बी वारंगुळे,एस यू वाल्हेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.
stay connected