*भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांना सत्तेचा माज शासन विविध योजनेला सामान्य जनतेच्या टॅक्स मधून निधी देतात लोणीकर तुमच्या बाप दादाची प्रॉपर्टी विकून नाही - सावता सेनेच्या वर्षा शिंदे यांनी केला तीव्र निषेध!*
पाटोदा *(प्रतिनिधी)* भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या शेतकरी आणि महिलांविरोधातील वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रभर वातावरण चांगलेच तापले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले, "तुझ्या बापाला पेरणीसाठी ६ हजार रुपये दिले, अंगावरचे कपडे आणि चप्पल सरकारने दिल्या. तुझी आई, बहिण, बायको हिला कपडे घेण्यासाठी सरकार पैसे देते," — या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
लोकप्रतिनिधीच्या या वक्तव्यामुळे सरकारचा अहंकार आणि जनतेविषयीचा तिरस्कार समोर आल्याची टीका होत आहे. विविध सामाजिक संघटनांनी आणि स्थानिक जनतेने यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशीच सावता सेनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ. वर्षा शिंदे यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटले, "भाजपचे आमदार स्वतःच्या बाप-दादांची प्रॉपर्टी विकून हे पैसे देत नाहीत. सरकारच्या योजना या सामान्य जनतेच्या टॅक्समधून चालतात."त्या पुढे म्हणाल्या, "सत्तेचा माज आल्यानेच लोकप्रतिनिधी असे उद्धटपणे बोलत आहेत. महिलांविषयी आणि शेतकऱ्यांविषयी अशा प्रकारची विधाने अत्यंत निंदनीय असून, आमदार बबनराव लोणीकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी."अशी मागणी सावता सेनेच्या मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ वर्षा शिंदे यांनी केली आहे.
stay connected