सोलापूरवाडी येथे शासकीय कृषी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करू.. आ.सुरेश धस यांची ग्वाही.

 सोलापूरवाडी येथे शासकीय कृषी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करू..
आ.सुरेश धस यांची ग्वाही..




वसंतराव नाईक कृषी पुरस्कार प्राप्त इंजि.हनुमंत गावडे यांचा सपत्नीक सत्कार संपन्न.. आष्टी प्रतिनिधी सोलापूर वाडी येथे माळरानावरील कोरडवाहू जमिनीमध्ये सेंद्रिय खते आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रयत्नांची पराकाष्ठा करून फळबाग फुलवलेल्या इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या विषयातील इंजिनीयर हनुमंत लक्ष्मण गावडे यांना महाराष्ट्र शासनाचा वसंततराव नाईक कृषी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आमदार सुरेश धस आणि सौभाग्यवती प्राजक्ता धस यांनी सोलापूर वाडी येथे जाऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला त्याप्रसंगी त्यांनी हनुमंत गावडे यांनी नवीन तंत्रज्ञान आणि ऑरगॅनिक पद्धतीचे पीएम बायोटेक या प्रॉडक्ट्स द्वारे विक्रमी उत्पादन घेऊन ड्रॅगन फ्रुट सफरचंद आणि सीताफळ या फळ पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले घेतले आहे या तंत्रज्ञानाचा तालुक्यातील इतर प्रगतिशील शेतकऱ्यांनी प्रेरणा घेऊन त्यांना उत्तम पद्धतीचे प्रशिक्षण देण्यासाठी सोलापूर वाडी येथे शासकीय कृषी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी दिली  

या वेळी आ.सुरेश धस आणि त्यांच्या सौभाग्यवती प्राजक्ता धस यांनी या फळबागेमध्ये जाऊन ड्रॅगन फ्रुट च्या तोडणी शुभारंभ केला..

 या वेळी  परिसरातील शेतकऱ्यांचा परिसंवाद मेळावा घेऊन.. हनुमंत गावडे यांनी कोरडवाहू असलेल्या शेतीवर शेततळे तयार करून कमी पाण्यावर नवीन तंत्रज्ञान आणि ऑरगॅनिक पद्धतीचे पीएम बायोटेक चे प्रॉडक्ट असलेले खते वापरून सर्वसाधारणपणे ड्रॅगन फ्रुट आणि सफरचंद यांचे मागील वर्षीपेक्षा पाचपट उत्पन्न घेतल्यामुळे या नवीन तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करू अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी दिली आणि  शेतकऱ्यांना संबोधित करताना आधुनिक व तांत्रिक शेतीची कास धरून प्रगतीचा मार्ग कसा साधावा याचे उदाहरण म्हणजे हनुमंत गावडे असून त्यांच्याकडून नवीन शेतकऱ्यांनी आदर्श आणि प्रेरणा घ्यावी असे आवाहन  करताना त्यांनी सेंद्रिय शेती ही एक काळाची गरज असून मानवी आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे सर्वांनी वळले पाहिजे, आणि त्यातून दर्जेदार उत्पन्नाची शाश्वती निर्माण केली पाहिजे याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले.. यावेळी तालुका कृषी अधिकारी गोरक्ष तरटे यांनी सेंद्रिय शेती कशी करावी ? व त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट शेतीमध्ये वापरावेत जेणेकरून शेतीचा ऑरगॅनिक कर्ब आणि एनपीके चा बॅलन्स साधला जाईल,याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच 

पीएम बायोटेक प्रॉडक्ट्स  व्यवस्थापकीय संचालक महेश माने यांनी पीएम बायोटेकच्या प्रॉडक्ट्स ची सविस्तर माहिती देऊन ऑरगॅनिक खते वापरल्यामुळे  फळांचा आकार आणि वजन वाढते आणि बाजारामध्ये टिकून राहण्याचे तंत्र आणि गुणवत्ता याची माहिती दिली..

याप्रसंगी हनुमंत गावडे यांनी सत्काराला उत्तर देताना शेती हा एक सर्वात मोठा व्यवसाय आहे, असे सांगत एक एकर ड्रॅगन मध्ये वीस लाख रुपये चे उत्पन्न कसे मिळवले ? याची तांत्रिक माहिती दिली.. या वेळी महाराष्ट्र राज्य दूध सहकारी महासंघ महानंद मुंबईच्या संचालिका प्राजक्ताताई धस, तालुका कृषी अधिकारी श्री गोरख तरटे ,पीएम बायोटेक चे व्यवस्थापकीय संचालक महेश माने, 

माऊली जरांगे, मंडळ कृषी अधिकारी प्रमोद कुडाळे, धानोरा मंडळातील सर्वच कृषी सहाय्यक .श्री गौतम आजबे, दवागव्हाणे ,रावसाहेब भस्मे, महेबूब फौजी बाळासाहेब थोरवे,सुनीलथोरवे, योगेश शेळके सरपंच सुंबेवाडी, राजू खुरांगे सरपंच धनगरवाडी ,राजू अल्हाडे बाळेवाडी ,रामदास शेंडगे, मल्हारी थोरवे, राहूल काकडे, नवनाथ जगताप, बाबासाहेब मुठे, बबन गाडे, आजिनाथ गव्हाणे, अशोक थोरवे उपसरपंच सोलापूर वाडी ,भास्कर घोडे, प्रमोद थोरवे, दत्तात्रय थोरवे यांचेसह परिसरातील  ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते प्रस्ताविक व आभार शिरीष भाऊ थोरवे यांनी केले.


**********

" पीएम बायोटेक " या ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स मुळे उत्पादनात प्रचंड वाढ.."


ड्रॅगन फ्रुट च्या बागेमध्ये पूर्णपणे पीएम बायोटेक ची ऑरगॅनिक पद्धतीची खते  गेल्या दोन वर्षापासून वापरत असल्यामुळे दर्जेदार उत्पन्न मिळत असून बागेवर कोणत्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत नाही आणि कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केलेला नाही त्यामुळे या फळांना ग्राहकांची पसंती असून पीएम बायोटेक कंपनीच्या खतांमुळे ड्रॅगन फ्रुट चे एकरी उत्पन्न २० ते २५ टना पर्यंत जाईल अशी स्थिती आहे 

तसेच या ऑर्गॅनिक प्रॉडक्ट मुळे फळांचा आकार देखील वाढला असून ७०० ग्रॅम ते  ०१ किलो पर्यंत एका फळाचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे तसेच फळावर चकाकी आणि ताजेपणा स्पष्ट दिसून येत असल्यामुळे ग्राहकाच्या पसंतीस उतरत आहेत..


--- हनुमंत गावडे
प्रगतीशील शेतकरी,सोलापूरवाडी ता.आष्टी जि.बीड





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.