डॉ. जितीन वंजारे आणि डॉ. प्रवीण खेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंगुसवाडे येथे वारकऱ्यांची सेवा संपन्न

 *डॉ. जितीन वंजारे आणि डॉ. प्रवीण खेडकर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंगुसवाडे येथे वारकऱ्यांची सेवा संपन्न*



        *संतश्रेष्ठ, राष्ट्रसंत, भगवान बाबा यांच्या पालखीचे आज मुंगुसवाडे येथून प्रस्थान झाले यावेळी मोफत औषधोपचार शिबीर दिले हे शिबीर डॉ प्रवीण खेडकर सर आणि डॉ जितीन वंजारे संजीवनी क्लिनिक मुंगुसवाडे यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. यावेळी वारीत आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी मोफत चहा, नाश्ता, पाणी बॉटल, बिस्कीट, आणि फळे वाटप करण्यात आले.यावेळी मुंगुसवाडे गावात संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्या रथाचे जंगी स्वागत करण्यात आले, एकनाथ वाडी या गावातर्फे जेसीबी नी पुष्पवृष्टी करण्यात आली.भगवान गडाचे मठाधीपती व महंत कृष्णा महाराज यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले, यावेळी गावातील महिला मंडळ यांनी लेझिम खेळून आनंदोस्तव साजरा केला, छोट्या मुलींनी व शाळकरी मुलांनी वारकरी पोशाख परिधान करून पालखीचे स्वागत केले, यावेळी सर्व टाळकरी, माळकरी आणि गावातील सर्व नागरिक वारकरी उपस्थित होते.



       *वारकरी दिंडी, पालखी आणि विशेष म्हणजे भगवान बाबांचा रथ गावातून वारी जातं असल्याने दर्शन घेणासाठी गर्दी जमा झाली होती. यापूर्वीही नाथ महाराजांची पालखी वारी येथून गेली होती त्यावेळी ही डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांच्या संजीवनी क्लिनिक तर्फे मोफत आरोग्य तपासणी देण्यात आली होती. सालाबादा प्रमाणे सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर दरवर्षी मोफत आरोग्यसेवा देतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.