डॉ. राजीव जाधव यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी प्राप्त

 *डॉ. राजीव जाधव यांना रसायनशास्त्र विषयात पीएच.डी प्राप्त*



वळण पिंप्री: शिरेगाव येथील रहिवाशी तथा सध्या आयर्लंड येथे  कार्यरत असणारे डॉ. राजीव अण्णासाहेब जाधव यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर विद्यापीठा मार्फत यांना नुकतीच पीएच. डी प्राप्त झाली आहे.

रसायनशास्त्र विषयामध्ये त्यांनी " Analytical Method Development and Validation for Quality Determination of Bioactive Drug Substances and

Products" या विषयावरती संशोधन केले, या संशोधनाशी निगडित त्यांचे काही रिसर्च पेपर हे नॅशनल व इंटरनॅशनल स्तरावर प्रकाशित आहेत. या संशोधनाकरीता  त्यांना डॉ. सरोज बेंबाळकर हे  मार्गदर्शक असून त्यांना त्यांच्याकडून बहुमुल असे मार्गदर्शन लाभले. या मिळालेल्या यशाबद्द्ल पंचक्रोशीतील समस्त मंडळीनी  अभिनंदन पर कौतुक केले आहे.

*डॉ. राजीव जाधव हे मा. उप सभापती कृ. बा. स. राहुरी स्व. पोपटराव अनाजी पवार पा. यांचे जावई तसेच  प्रगतशील शेतकरी यशपाल पवार, संजु उर्फ युवराज पवार यांचे मेहुणे आहेत.*




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.