सात्रळच्या रयत कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या निकालाची परंपरा कायम राखली

 *सात्रळच्या रयत कनिष्ठ महाविद्यालयाने बारावीच्या निकालाची परंपरा कायम राखली*



सात्रळ-(वार्ताहर) राहुरी तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने नुकत्याच जाहीर झालेल्या एच.एस.सी परीक्षा-२०२४-२५ मध्ये यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.यात कला विभागाचा ९२.१५% टक्के तर विज्ञान शाखेचा १००% टक्के निकाल लागला आहे. 

     विशेष बाब म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेतील ३१० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यामध्ये ०६ विद्यार्थी विशेष प्राविण्य व ६९ विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान शाखेतील अनुक्रमे प्रथम क्रमांक संसारे तेजस भाऊसाहेब व तांबोळी रेहान अफरोज-८०.६७, द्वितीय क्रमांक कु धनवट समीक्षा सिताराम-७८.००, तृतीय क्रमांक दिघे स्मिता मनोहर-७७.५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. त्याचप्रमाणे कला विभागात ५१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये ०४ विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले. कला विभागातील अनुक्रमे प्रथम क्रमांक बलमे प्रिया अशोक-६७.३३% , द्वितीय क्रमांक पेटारे अमूल्या राजेंद्रकुमार,-६३.१७% तर तृतीय क्रमांक बलमे विद्या बबन-६०.०५ टक्के गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण झाले.



   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष-अरुण कडू पाटील, उत्तर विभागाचे अध्यक्ष आशुतोषदादा काळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, स्कूल कमिटी सदस्य,ॲड. विजयराव कडू पाटील, संभाजीराव चोरमुंगे, बबनराव कडू पाटील, भास्करराव फणसे,प्राचार्य सिताराम गारुडकर,पर्यवेक्षिका हेमलता साबळे, माजी प्राचार्य राजेंद्र बडे,माजी पर्यवेक्षिका सुशिला थोरात, डॉ.के.के.बोरा, किशोरशेठ भांड, युवानेते किरण कडू पाटील, पंकज कडू पाटील, विक्रांत कडू पाटील, गणेश कडू पाटील, भाऊसाहेब पेटकर,विभागप्रमुख विलास दिघे तसेच स्थानिक स्कूल कमिटी, पालक शिक्षक संघ,शाळा व्यवस्थापन व विकास समिती,माता पालक संघ,सर्व ग्रामस्थ पालक,सर्व सेवकवृंद शिक्षण प्रेमी व विद्यार्थी व पंचक्रोशीतील सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.