आटोळ्यांच्या आटओळ्या..!
लय, स्थिती, गती..!
दोनशे कोटी 'थक'बाकी कर्ज असणार्या,
कारखान्यावर संचा'लक' होण्यासाठी शेकडोंच्या उड्या-
आत्मपरीक्षण करा, आपण कुठे चाललोय गड्या?
सहकारात बोकाळलाय 'स्वा'हाकार-
सहकार क्षेत्रात आज आहे हाहाकार!
सहकार मोजतोय शेवटच्या घटका-
सभासदांना त्याचा बसतोय फटका!
तज्ञ समस्या सोडविण्यात असतात पटाईत-
निर्माण करण्यातही तेच असतात सराईत!
"डर"-काळी..!
'माळेगाव'च्या निवडणुकीची लागली चाहुल-
चार हजार रुपये 'भावा'ची उठवतात हूल!
हूल-बाय हूल, निवडणुकीची झुल-
पाच वर्षे काढली 'कुल'!
शेतकरी आशा'वादी' असतात-
बरेच काही ते सोसतात!
वाटे कडे लागले डोळे..!
चैत्रात नव पालवीने निसर्ग 'नट'ला!
वैशाख वणवा पेटला!
पावसा, लक्ष लागले तुझ्या आगमनाकडे-
लवकर ये गडे!
तुझ येण म्हणजे नुसत येण नसत-
निसर्गाला नव 'चैतन्य' देण असत!
उस उत्पादकतेत वाढ..?
कृत्रिम बुद्धिमत्तेतुन उसाचे वजन, उतारा,
वाढविण्याच्या फैरी झडत आहेत-
गळितात प्रती हेक्टरी ८८ टनावरुन,
७५ टनावर येऊन वजन घटत आहे!
शेत जमीनीच्या सुपिकतेचा रास,
रासायनिक खतांचा,पाण्याचा अवास्तव वापर-
ऐ आय कुणावर फोडणार खापर?
धोक्यात आहे,
उस उद्योगाची दीर्घकालीन शाश्वता-
ठामपणे धोरणे राबविण्याची आहे आवश्यकता!
stay connected