डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने
डॉक्टर बाबासाहेबांची जयंती. जगात डॉक्टर बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी होणार आहे. त्याचं कारण आहे, त्यांना मानत असलेली मंडळी. आज डॉक्टर बाबासाहेबांना बरेच लोकं मानायला लागले आहेत. परंतु आजही काही लोकं तांदळातील खड्यासारखे आहेत की जे तांदळातील खड्यागत स्वतःला थोर समजतात व डॉक्टर बाबासाहेबांचा पदोपदी अपमान करतात. जसं की डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांचं भलंमोठं नुकसानच केलं आहे.डॉक्टर बाबासाहेबांबद्दल सांगायचं झाल्यास सर्वांनाच माहीत आहे की त्यांनी संविधान बनवलं व त्याच संविधानाअंतर्गत त्यांनी जगाला संदेश दिला जेव्हा त्यांनी घटना बनवली. त्या घटनेत त्यांनी सर्वप्रथम ओ बी सी वर्गासाठी कलम लिहिली. जी कलम ३४० रुपानं आजही अस्तित्वात आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या वर्गासाठी कलम लिहिली. हे सत्य आहे. तरीही आजचा ओबीसी वर्ग बाबासाहेबांना मानत नाहीत. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाचा लाभ घेतात. परंतु त्यांच्यावर ताशेरे ओढतातच. ही वास्तविकता आहे. एवढंच नाही तर हा ओबीसी वर्ग बाबासाहेबांच्याच लेकरांना त्रास देत असतांना त्यांच्या पुतळ्याचा अपमान करतो. ही वास्तविकता आहे. ज्या गोष्टी येथील तमाम अस्पृश्य वर्ग खपवून घेवू शकत नाही.
डॉक्टर बाबासाहेबांना जातीप्रथा आवडत नव्हती. जातीजातीत गुरफटलेला समाजही त्यांना आवडत नव्हता. तशीच जातीजातीतील भांडणं त्यांना आवडत नव्हती. धर्मातील भांडणंही त्यांना आवडत नव्हतीच. तरीही समाज भांडणं करीतच होता. ती भांडणं होवू नयेत. म्हणूनच बाबासाहेबानं जे संविधान बनवलं. त्या संविधानानुसार बाबासाहेबांनी लोकांची भांडणं होवू नये. तशीच देशात शांतता टिकावी. म्हणून जे संविधान बनलं. त्यातून बरीचशी भांडणं थांबली. परंतु बाबासाहेब बदनाम झाले नव्हे तर त्यांना बदनाम केलं गेलं.
विशेष सांगायचं झाल्यास कोणीही डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करु नये. त्यांचा सन्मानच करावा व जगाला दाखवून द्यावं की आम्हीही बाबासाहेबांचीच लेकरं आहोत. त्यातच जो कोणी आपल्या बाबासाहेबांवर ताशेरे ओढत असतील तर त्यांनाही त्यांची जागा दाखवावी. हे करतांना विचार करावा की जर बाबासाहेब झाले नसते तर आजही आपण गुलामासारखेच राहिलो असतो. आपला उद्धार आजही झाला नसता. काल ज्या शक्तीनं आपल्याला गुलाम केलं होतं. आज तीच शक्ती राजसत्तेवर असती अन् त्याच शक्तीचे आपण गुलाम असतो. विचार करावा की काल आपल्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून आज अशी कोणतीच शक्ती आपल्याला गुलाम करु शकत नाही. आपल्यावर वर्चस्व गाजवू शकत नाही. आपलं अस्तित्व समाप्त करु शकत नाही. याच गोष्टींवर विचार करुन आपण आपलं पाऊल टाकावं. बाबासाहेबांना बदनाम करु नये. त्यांना सन्मान द्यावा. कारण ते आपले पिता आहेत आणि आपण सर्वजण त्यांची लेकरं. कारण बाबासाहेबांनी केवळ एका एससी वर्गासाठी संविधान लिहिलं नाही, तर संविधान सर्व वर्गासाठी लिहिलं. सर्व जातीतील लोकांसाठी लिहिलं. तसंच सर्वच धर्मातील लोकांसाठी लिहिलं. त्यांनी जगाला एक प्रकारची दिशा देण्यासाठी संविधान लिहिलं. आजही त्यांच्या संविधानाचा अभ्यास विविध देशात केला जातो. एवढंच नाही तर जगातील विविध धर्मातील लोकांनीही त्यांचं संविधान स्विकारलं आहे. आपणही तसाच रास्त विचार करुन आपण आपलं आपल्या देशातील वर्तन सुधरावं म्हणजे झालं. त्या विचारांचं परिवर्तन होवू देवू नये. जेणेकरुन देशाचं वातावरण गढूळ होईल व देशहिताला मळकटपणा येवू शकेल. आपण आपलं वागणं बदलवावं व संविधानाप्रती आत्मीयता बाळगून वागावं. म्हणजेच बाबासाहेब जयंती आपण खऱ्या अर्थानं साजरी केली असे वाटेल. आपण जर आपल्या मनात कलुषीतपणा ठेवत असू, तर आपली त्यांची जयंती साजरी करण्याला काहीच अर्थ उरणार नाही
एवढंच यानिमित्यानं सांगणं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
x
x
stay connected