एस.एम.देशमुखांसह टीमची मध्यप्रदेशात एंट्री...
मध्यप्रदेश स्टेट प्रेस क्लबचे राष्ट्रीय अधिवेशन सध्या इंदोर येथे सुरू आहे.. या पत्रकारिता महोत्सवात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.श्री. एस.एम.देशमुख यांच्या सह टीम चा विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यात मराठी पत्रकार परिषदेचे जाळं निर्माण करणारे तमाम पत्रकार बांधवांच्या सुखदुःखात सदैव तत्पर राहुन आपल्या हक्काचा माणूस म्हणून एस.एम.देशमुख सर यांच्या कडे तळागाळातील पत्रकार पाहतो आहे. निश्चितच महाराष्ट्र राज्यातील तमाम पत्रकारांना अभिमान वाटतो. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची मध्यप्रदेश प्रेस मध्ये एंट्री झाली असून मध्यप्रदेश स्टेट प्रेस कडून मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक सर, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य जान्वी ताई पाटील सह आदींचे यथोचित स्वागत करण्यात आले.
stay connected