शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी अनेक कठोर निर्णय घेतले.कशाचीही पर्वा केली नाही..
आमदारकीच्या सुरुवातीसच ३६ कोटी रू.चा गाळ काढला..
आष्टी (प्रतिनिधी)
आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेतले सन २००२/०३ मध्ये केंद्र शासनाच्या योजनेतून ३६ कोटी रु. किमतीच्या गाळ काढण्याची योजना आपण तालुक्यात राबवली.. तेव्हापासून या योजनेचे महत्त्व तालुक्यातील शेतकऱ्यांना समजले आहे.. शेतकऱ्यांना आता फक्त आर्थिक मदतीची आवश्यकता असून बँकांनी या गाळ काढण्याच्या योजनेसाठी शेतकऱ्यांना कर्ज दिले पाहिजे अशी आपली ठाम आग्रही मागणी असून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ऐवजी आता आष्टी पाटोदा आणि शिरूर हे तालुके आर्थिक व्यवहारासाठी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जोडण्याचा आपला प्रयत्न असून याबाबत मंत्री विखे पाटील साहेब आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे असे सांगत आष्टी तालुक्यातील चार प्रकल्पांमधील गाळ करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय संस्था नाम फाउंडेशन चे संचालक नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे आणि टाटा मोटर्स यांचे यांचे आभार व्यक्त केले.
या पूर्वी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कोणत्याही टोकाला जाऊन निर्णय घेतले असून अगोदर निर्णय घेऊन मग जनतेला समजून सांगण्याचे काम केले आहे असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले.. गाळमुक्त धरण आणि गाळ युक्त शेत या योजनेअंतर्गत तालुक्यातील..मेहेकरी मध्यम प्रकल्प, रूटी मध्यम प्रकल्प, कडा मध्यम प्रकल्प,आणि कडी मध्यम प्रकल्प,या चार मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचे करण्यासाठी नाम फाउंडेशन पुणे आणि टाटा मोटर्स यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यापैकी रूटी मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी केशव आघाव साहेब,नाम फाउंडेशन मराठवाडा विभागाचे राजाभाऊ शेळके उप अभियंता पाखरे, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 सोळंके मॅडम, दुधसंघ चेअरमन शांतीलाल भोसले,कृषी उत्पन्न बाजार समिती पाटोदा सभापती किरण शिंदे, माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे,मेश्राम मॅडम मंडळ अधिकारी सोनाली कदम,बाबासाहेब भोसले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की, आमदारकीच्या पहिल्या टर्म मध्येच सन २००२/०३ मध्ये केंद्र शासनाच्या योजनेतून..३६ कोटी रुपये किमतीच्या कामास मंजुरी आणून तलावातील गाळ काढला होता तेव्हापासून पासून शेतकऱ्यांना गाळाचे महत्व कळाले आहे त्यानंतर राज्यमंत्री असताना २०१२ मध्ये राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता.ही योजना अत्यंत उपयुक्त मात्र शेतकऱ्यांकडे पैशाची कमतरता असल्यामुळे बँकांनी त्यांना तात्काळ यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे यापूर्वी मी याच मागणीसाठी आंदोलन केले असता पाटोदा येथे येथे माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता सन २०१४ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण राज्यात हा उपक्रम राबवला होता परंतु आष्टी मतदारसंघाच्या तात्कालीन लोकप्रतिनिधींनी त्यावेळी काहीही केले नाही..आता पुन्हा आमदार झाल्यानंतर मी हे काम हाती घेतले आहे.मतदार संघासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मी अनेक ठोस निर्णय घेतले त्यावेळी पक्ष सोडताना स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना कल्पना दिली त्याचप्रमाणे आता देखील अजितदादा यांना कल्पना देऊन आपण परत भारतीय जनता पार्टीत आलो आहोत.मी जे केले ते सांगून केले आणि अगोदर केले आणि नंतर त्याचे महत्त्व पटवून दिले.प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे मातीशी नाळ असलेले अभिनेते असून त्यांच्याकडून हे समाजाभिमुख असलेले काम होत आहे या कामासाठी मन मोठे असावे लागते दानत असावी लागते ती दानत आणि मोठे मन या दोन व्यक्तींकडे असल्याचे सांगून त्यांनी त्यांचे आणि राजाभाऊ शेळके,आणि केशव आघाव ,टाटा मोटर्स यांचे आभार व्यक्त केले.यावेळी या भागातील गणेश शिंदे,
अशोक मुळे, अजित घुले,दिंडे,खेमगर,पोपट गोंडे,खंडू जाधव,नवनाथ चखाले,भाऊसाहेब निंबाळकर,अंकुश आवारे,राधाकिसन पोकळे, गंगाधर पडोळे,खंडू तोडकर,संतोष मुरकुटे, गंगा गोल्हार, भगवान शिनगारे,बाळासाहेब बोराडे,अजित मुळे,सचिन लोखंडे,राम योगे,संतोष रणसिंग,अतुल कोठुळे,महादेव कोंडे,मनोज धनवडे,इर्शान खान,जुनेद शेख,आशिष अग्रवाल, कपिल अग्रवाल, रावसाहेब मुटकुळे,भगवान शिंनगिरे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित होते.
stay connected