*अल्पवयीन मुलांमुलींसाठी समाज माध्यमांच्या वापरावर निर्बंध येणार*
*डॉ. रेखा चौधरी यांच्या प्रयत्नांना यश*
आष्टी: वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे च्या माध्यमातून अल्पवयीन मुलांमुलींना मोबाईल फोन आणि समाज माध्यमांच्या वापरावर निर्बंध यावेत यासाठी डॉ. रेखा चौधरी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या संदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश मा. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत.
वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे आणि झेप फाउंडेशनच्या माध्यमातून लहान मुलांच्या मोबाईल वापरावर निर्बंध यावेत ह्यासाठी डॉ. रेखा चौधरी, डॉ. वैशाली चव्हाण आणि टीमने सातत्याने लढा चालू ठेवला आहे. विविध कार्यशाळा आणि परिषदांतून मोबाईल आणि समाज माध्यमांच्या वापरावर खास करून अल्पवयीन मुलांमुलींना निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले जात होते. डॉ. रेखा चौधरी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून ह्या विषयाला वाचा फोडली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मा. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला तसे निर्देश दिले आहेत. आठ आठवड्याच्या कालावधीत सरकारने योग्य ती कार्यवाही करून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अल्पवयीन मुलांमुलींना मोबाईल फोन व समाज माध्यमांच्या वापरावर निर्बंध आणण्यासाठी वय ठरवणारी प्रणाली निश्चित करावी असे सुचविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल वर्ल्ड डिलिटल डिटॉक्स डे जिल्हा समन्वयक ॲड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान निंबोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
stay connected