ASHTI | घरात घुसून महिलेवर अत्याचार : तिघांविरुद्ध अत्याचार, अॅट्रॉसिटी कलमानुसार अंभोरा ठाण्यात गुन्हा नोंद
पांढऱ्या रंगाच्या गाडीत आलेल्या तिघांनी लोटून घेतलेला दरवाजा ढकलून आत प्रवेश करत महिलेवर अत्याचार केल्याची घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली. ४० वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून अत्याचार, अॅट्रॉसिटीसह इतर कलमानुसार गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावात ९ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान महिला पतीसह घरात होती. याच दरम्यान घराच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची गाडी थांबल्याने पतीवर आष्टी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल असल्याने पोलिस आल्याचा संशय आल्याने पती घरातून पळून गेला. त्यानंतर महिलेने घराचा दरवाजा लोटून घेतला. लगेच तिघा जणांनी दरवाजा उघडून आत प्रवेश करत दोघा जणांनी महिलेचे हातपाय धरले तर एकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली.
याप्रकरणी ३५ वर्षीय पीडीत महिलेने गुरुवारी रात्री उशिरा अंभोरा पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध अत्याचार व अॅट्रॉसिटीसह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आष्टीचे प्रभारी उपअधीक्षक कमलेश मीना करीत आहेत. दरम्यान, पीडित महिलेच्या पतीवर अंभोरा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. गाडीत पोलिस असल्याचा संशय आल्याने पती घरातून पळून गेल्यानंतर ही घटना घडली आहे. पिडीत महिलेने सदरील घटना आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक निकाळजे (वंचित बहुजन आघाडी आष्टी तालुका ) यांना सांगीतली असता त्यांनी पिडीत महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत गुन्हा दाखल करण्यात आला .


stay connected