Bhimrao Dhonde व धर्मादाय उपायुक्त श्री चौधरी यांच्या उपस्थितीत महेश आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न

 मा.आ.भीमराव धोंडे व धर्मादाय उपायुक्त श्री. प्र.म. चौधरी  यांच्या उपस्थितीत महेश आयुर्वेद महाविद्यालय व 
रुग्णालय येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न 



 आष्टी प्रतिनिधी   


मा.आ.भीमराव धोंडे व धर्मादाय उपायुक्त श्री. प्र.चौधरी  यांच्या उपस्थितीत महेश आयुर्वेद महाविद्यालय व 

रुग्णालय येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर  शुक्रवार दि . 13.09.2024 रोजी संपन्न झाले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मा.आ.भीमराव धोंडे, प्रमुख पाहुणे

मा. श्री. प्र .म चौधरी  धर्मादाय उप आयुक्त कार्यालय बीड , डॉ अजय दादा धोंडे,मा. श्री अरुण मुंडे अधीक्षक धर्मादाय आयुक्त कार्यालय बीड , अँड महेश वारे  धर्मादाय आयुक्त कार्यालय बीड , अँड आदिनाथ जायभाय ,श्रीयुत चंदनशिव सर समन्वयक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.चंद्रकांत गोसावी यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मा. प्र .म चौधरी  यांनी शासनाच्या योजनांबाबत माहिती दिली यामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्य कामगार विमा योजना मुख्यमंत्री सहायता निधी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राष्ट्रीय उद्योग वृद्धापकाळ आरोग्य सुरक्षा कार्यक्रम या योजनेची शासन स्तरावरील अंमलबजावणी करण्यासंदर्भात रुग्णांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय मा. आ.भीमराव  धोंडे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये समाजातील गरीब रुग्ण व  आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या रुग्णांसाठी विविध उपाययोजना व खाजगी रुग्णालयांमध्ये आर्थिक दुर्बल दृष्ट्या रुग्णांसाठी ठेवण्यात आलेल्या राखीव कोट्यासाठी मोठ्या मोठ्या शहरातील रुग्णालयांमध्ये आरक्षित असणाऱ्या खाजगी रुग्णालयामध्ये आर्थिक व दुर्बल दृष्ट्या रुग्णांसाठी सहाय्यता उपलब्ध करून माननीय आयुक्तांनी याबाबत पाठपुरावा करून गरीब रुग्णांसाठी आर्थिक शोषण न होता शासनाच्या योजनेची योग्य प्रकारे अंमलबजावणी होते की नाही याची खातरजमा करून गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्यात यावा या संदर्भात मार्गदर्शन केले व समाजातील शेवटच्या घटकांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळवून रुग्णांना जास्तीत जास्त चांगले उपचार कसे करण्यात येतील त्यासंबंधी मार्गदर्शन केले याप्रसंगी संस्थेचे सहसचिव डॉ. अजय दादा धोंडे यांनी पण रुग्णांना मार्गदर्शन केले, यावेळी राजेंद्र काका धोंडे ,अभय राजे धोंडे ,प्रशासकीय अधिकारी डॉ .डी बी राऊत , प्रा.शिवदास विधाते,  माऊली बोडखे , संजय शेंडे होते व रुग्णांची तपासणी डॉ.मोहिनी गोसावी, डॉ.राहुल काळे ,डॉ.विशाल हेंड, डॉ, अक्षता इथापे, डॉ. केतन गर्जे , रक्त व लघवी तपासणी विशाल गोरे, अमृता गरगडे , गौतम बोडखे व नर्सिंग स्टाफ व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आभार प्रदर्शन प्रा.शिवदास विधाते यांनी केले या शिबिरात 223 रुग्णांनी मोफत ईसीजी ,ब्लड शुगर ,ब्लड प्रेशर आधी तपासण्या करण्यात आल्या



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.