आष्टीत तलाठी हत्येच्या निषेधार्थ, कामबंद आंदोलन
---------------
कडा / राजेंद्र जैन
-------------
वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष देवराव पवार यांच्यावर कर्तव्य बजावत असताना भर दुपारी कार्यालयात भ्याड हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्या घटनेच्या निषेधार्थ आष्टीत महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरुवारी कामबंद आंदोलन करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तलाठी संतोष देवराव पवार यांच्यावर दि. 28 ऑगस्ट रोजी भर दुपारी कर्तव्यावर असताना कार्यालयात भ्याड हल्ला करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आष्टीत महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरुवारी काम बंद आंदोलन करून महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार बालदत्त मोरे यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच दिवंगत पवार यांना निवृत्ती होण्याच्या तारखेपर्यंत वेतन लाभ लागू करण्यात यावा. त्यांच्यावर वरील खटला हा जलद गती न्यायालयात चालवून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. या आंदोलनात मंडळ अधिकारी, तलाठी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
------%-------
stay connected