आष्टी तालुक्यातील क-हेवाडीत भर दुपारी घरफोडी
६ तोळेसह ५० हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार
तपासासाठी पथक नियुक्त
आष्टी ( प्रतिनिधी):-
तालुक्यातील क-हेवाडी येथील बंद घराचे कुलूप तोडून ६ तोळे दागिन्यांसह रोकड ५० हजार रुपये रोकड सह एकुण २ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी दुपारी ११.३० ते १२.३० या दरम्यान घडली ही घटना भर दुपारी
कुटुंबासह शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या घरी चोरट्यांनी घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी केली आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलिस बुब्रुवान वाणी यांनी भेट दिली असून घटनास्थळी फिंगरप्रिंट पथक दाखल झाले असून चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील कऱ्हेवाडी येथील शेतकरी खंडु हरीभाऊ सांगळे यांच्या कुटुंबातील इतर सदस्य बुधवारी सकाळी शेतात कांदा लावणीसाठी गेले होते. दुपारी घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले ६ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ५० हजार रूपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ५४ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात खंडु सांगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण शिंदे हे करीत आहेत.घटनास्थळी पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, पोलिस बुब्रुवान वाणी यांनी भेट दिली असून घटनास्थळी फिंगरप्रिंट पथक दाखल झाले असून चोरट्यांच्या शोधासाठी पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी पोलिसांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे.
-----------
शेतात जा पण घर ही संभाळा पोलिसांचे आवाहन
सध्या शेतकऱ्यांचे शेतात कामे सुरू असून लग्न समारंभ ही असल्याने याच संधीचा फायदा घेत चोरटे घर साफ करतात. त्यासाठी गावी जाताना घरांना मजबूत कुलूप आणि सेफ्टी यंत्रणा बसवा, मौल्यवान दागिने रोख रक्कम बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा, असे आवाहन पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी केले आहे.
-----------
चोरांच्या शोधासाठी पोलिस पथक
क-हेवाडी येथे झालेल्या चोरीची दखल पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या तातडीने घेण्यात आली असून तपासासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे.यामध्ये पोलिस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, बब्रुवान वाणी,विकास जाधव,बबुशा काळे यांचा समावेश आहे.
stay connected