छेडछाड अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही - मंगेश साळवे
आष्टी प्रतिनिधी - आपले मुले, मुली आंगणवाडी, शाळा, कॉलेज मध्ये शिकत असताना ती सुरक्षित राहावी म्हणून अंभोरा पोलीस स्टेशन मार्फत 'पोलीस काका, आणि 'पोलीस दिदी' हा अभिनव उपक्रम चालु केलेला आहे. त्या अंतर्गत प्रत्येक शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने सखोल मार्गदर्शन करून जनजागृती केली जात आहे. आपल्या मुला मुलींचे शिक्षण सुरक्षित वातावरणात पूर्ण व्हावे म्हणून यापुढे त्यांच्यावर अन्याय/अत्याचार करणाऱ्याची आजिबात गय केली जाणार नसून कठोर कारवाई केली जाईल असे प्रतिपादन अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी 'तेजवार्ता' बोलताना सांगितले.
त्याचाच एक भाग म्हणून आपण प्रत्येक अंगणवाडी/शाळा/कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंभोरा पोलीस स्टेशन मार्फत बॅनर तयार केलेले आहे. ते बॅनर प्रत्येक शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अथवा ज्या ठिकाणहून प्रत्येकाला दिसेल असे शाळेच्या आवरात बसवणार आहोत.
सदरच्या बॅनर मुले अल्पवयीन मुला-मुलींमध्ये जनजागृती होईल तसेच असे कृत्य करणाऱ्यावर होणाऱ्या कडक कारवाईमुळे अशा विकृतीना नक्कीच जरब बसेल असे ही सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी 'तेजवार्ता'शी बोलताना सांगितले.
stay connected