डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली......
****************************
दहीहंडी महोत्सवाच्या नेत्रदीपक सोहळ्याने डोळ्याचे पारणे फिटले.
***************************
जयदत्त सुरेश धस मित्र मंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सवास तौबा गर्दीने आष्टीकरांचे लक्ष वेधले.
****************
आष्टी (प्रतिनिधी)
हाथी घोडा पालकी,जय कन्हैया लाल की. या जय घोषाने डीजेच्या तालावर थिरकलेली तरुणाई तर सात थरांची अंगावर शहारे आणणारा दहीहंडी पथकांचा तो जल्लोष आणि हा नेत्र दीपक सोहळा पाहण्यासाठी उसळलेल्या जनसागराने आष्टी करांचे पारणे फेडत तौबा गर्दीने लक्ष वेधले.
युवा नेते जयदत्त सुरेश धस मित्र मंडळ आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव 2024 या कार्यक्रमास माजीमंत्री सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती होती. तर श्रीकृष्ण पूजा करून भव्य दहिहंडी कार्यक्रमांचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास धस,भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.साहेबराव म्हस्के, युवा नेते सागर धस,युवा नेते तथा सरपंच राधेश्याम धस, प.स.माजी उपसभापती अजिनाथ सानप,माजी प.स.सदस्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे यशवंत खंडागळे,एन. टी.गर्जे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
इंदापूर येथील व्यंकटेश पथकाच्या गोपाळांनी ही दहीहंडी फोडण्याचा मान पटकावित स्पर्धेत बाजी मारली.यावेळी विजेत्या संघास रोख स्वरूपात बक्षीस आणि सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
आष्टी शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा धार्मिक कार्यक्रमांनी विविध ठिकाणी उत्साहात पार पडला.यावर्षी प्रथमच आष्टी शहरात पंचायत समिती प्रांगणात बुधवार (दि.२८) रोजी जयदत्त धस मिंत्रमंडळाच्या वतीने दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी 4 वाजेपासूनच या महोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला.या दहिहंडी निमित्त प्रमुख आकर्षक बॉलीवूड अभिनेत्री सई मांजरेकर मराठी तारका मानसी नाईक श्री स्वामी समर्थ मालिकेतील भूमिका साकारणारी मोहिनी अवसरे प्रसिद्ध नृत्यांगना झेबा शेख यांची तर माजीमंत्री सुरेश धस यांची प्रमुख उपस्थिती होती.लेजर लाईट शो, डि.जे.च्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि आकर्षक विद्युत रोषणाई व फटाक्यांची आतषबाजी याने या सोहळ्याची दिमाखात सुरुवात झाली.या महोत्सवात दोन संघांनी सहभाग घेत आपापली कामगिरी यावेळी चांगल्या पद्धतीने करून दाखविली.प्रथमतः इंदापूर येथील व्यंकटेश गोविंदा पथक व भिगवण येथील शिवरूद्र गोविंदा पथकाने सलामी दिली.यानंतर इंदापूर येथील व्यंकटेश गोविंदा पथकाने 7 थर लावून ही दहीहंडी फोडली आणि विजयाचे मानकरी ठरले.
याप्रसंगी माजी शिक्षण सभापती उध्दव दरेकर, जि.प.सदस्य माऊली जरांगे,सभापती बद्रीनाथ जगताप,ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भवर, गणेश शिंदे, नगराध्यक्ष जिया बेग,पाटोदा नगराध्यक्ष राजू जाधव,माजी सभापती अशोक इथापे, महेश हंबर्डे,अमोल शिंदे,युवा नेते अभिजीत शेंडगे सरपंच उद्धव पवार,सरपंच अजित घुले,महेश खकाळ,युवराज बर्डे, माजी सरपंच राम धुमाळ,यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.नियोजनबद्ध आणि शिस्तबध्द आयोजन केलेल्या जयदत्त धस मित्र मंडळाच्या दहीहंडी महोत्सवाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
आष्टीकरांचे दहीहंडी महोत्सवातील तौबा गर्दीने लक्ष वेधले..
************************
पुणे,मुंबई या धर्तीवर मोठमोठ्या शहराप्रमाणे आष्टी शहरात प्रथमच भव्यदहीहंडी महोत्सव आपल्या ग्रामीण भागात पार पडला आणि या उत्सवास तरुणाईने तौबा गर्दी करत लक्ष वेधले. अष्टीकरांनी समाधान व्यक्त करत युवानेते जयदत्त सुरेश धस मित्र मंडळाच्या अतिशय शिस्तबद्ध नियोजनाबदल उपस्थितांनी आभार मानले..
stay connected