आम्ही चळवळीचे वारसदार आहोत!
जयंती: अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असलेला हाच तो समाज
माजलगाव /प्रतिनिधी
जग बदल घालुनी घाव,सांगून गेले मला भीमराव असा हुंकार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी दिला होता. परंतू समाजाने या शब्दांना नीटपणे समजून घेतले नाही. याउलट नेत्यांनीही समजून सांगितले नाही.त्यामुळे समाजाचे म्हणावे तेवढे परिवर्तन झाले नाही.असे असले तरी, अण्णाभाऊ साठेंना अभिप्रेत असलेली परिवर्तन जयंती माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथे साजरी झाली आहे. त्यामुळे देशात परिवर्तन जयंती म्हणून आदर्श निर्माण झाली आहे.
माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती गुरुवार (दि.29) ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली. युवा कार्यकर्ते शंकर आलात यांच्या संकल्पनेतून हा साहित्यसम्राट महोत्सव संपन्न झाला. विशेष म्हणजे या जयंतीत पंचशील ध्वज, निळा झेंडा आणि पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेला समाज दिसून आला.त्यामुळे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती खऱ्या अर्थाने परिवर्तनाच्या दिशेने निघालेली ठरली आहे. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना अभिप्रेत असलेला समाज, या जयंतीने राबविलेल्या उपक्रमातून दिसून आला.अण्णाभाऊ साठेंच्या विचारातून परिवर्तन घडविणाऱ्या समाजाने बीड, नव्हे राज्य नव्हे तर देशात अशी जयंती पहिल्यांदाच साजरी केली आहे. एरवी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना झेंडा कोणता, नियोजन कसे असावे यावर चर्चा होते. मात्र अण्णाभाऊ साठे यांना नेमके काय अभिप्रेत होते. यावर चर्चा होत नाही. परंतु निपाणी टाकळी येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीने त्या लोकांना परिवर्तन काय असते हे दाखवून दिले आहे. यावेळी या रॅलीचे उद्घाटन मा, अमोल भैया शेरकर यांनी केले तसेच या रॅलीला आवर्जून उपस्थित अंकुश अण्णा जाधव धम्मानंद भाऊ साळवे,मा, भगवान भाई राठोड सरपंच बाबा सर एडवोकेट सय्यद दादासाहेब सोळंके जी एन घनगाव कृष्णा बाप्पा घनगाव ही सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाचे आयोजन आ यो ज क - शंकर आलाट ,बालाजी,उमाजीं आलाट व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा, रमेश आलाट, केशव आलाट , धर्मराज आलाट , पांडुरंग आलाट अशोक पोळ महादेव पोळ सर्जेराव फंदे केशव आलाट ,लक्ष्मण आल्हाट राजू आलाट अनिल आल्हाट , महादेव आलाट काशिनाथ आलाट, नितीन आलाट, विशाल अशोक आलाट, वसंत आलाट, नागनाथ आल्हाट , मोतीराम आलाट सतीश आल्हाट भीमराव शाहीर आलाट यांनी परिश्रम घेतले ..!!
stay connected