CHANDRAPUR | मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर - जिल्हाधिकारी विनय गौडा
- निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. 7 टप्प्यात होणारी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यात निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा समावेश आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निवडणूक नियोजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. लोकसभा क्षेत्रातील चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी व आर्णी क्षेत्रात एकूण 18 लाख 36 हजार 314 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे, ज्यामध्ये 9 लाख 45 हजार 26 पुरुष मतदार तर 8 लाख 91 हजार 240 स्त्री मतदारांची संख्या आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार क्षेत्रात 24 हजार 120 नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारास गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण मतदान केंद्राची संख्या 2 हजार 44 आहे, 4 जूनला शहरातील वखार महामंडळ MIDC या ठिकाणी मतमोजणी होणार आहे. मतमोजणी ठिकाणी 1 CRPF कंपनी, SRPF व स्थानिक पोलीस अशी 3 सर्कल मध्ये सुरक्षा असणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडणार याची आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली.
stay connected