सबा पठाणचा पहिला रोजा पूर्ण
आष्टी /प्रतिनिधी
तालुक्यातील मुर्शदपूर येथील लोकसेवा इलेक्ट्रॉनिक्स चे मालक सलीम पठाण यांच्या सहा वर्षीय मुलगी सबा पठाण या मुली ने आयुष्यातील पहिला रोज़ा पुर्ण केला . घरातील मोठी मंडळी दररोज़ पहाटे उठून सहरी करत रोज़े धरताना त्यांच्यासोबत लहान मुलेही उठतात आणि सहरी करून रोज़े धरतात अशाच प्रकारे सबा सलीम पठाण या सहा वर्षीय मुलाने ने ही आयुष्यातील पहिला रोज़ा ठेवून पूर्ण केला . एकीकडे सूर्य आग ओकत असताना , तापमान ४० अंशापेक्षा जास्त असताना जिथे भल्याभल्यांच्या जिवाची लाही लाही होत आहे , तिथे इस्लाम धर्माचा सर्वात पवित्र महिना म्हणून गणला जाणारा रमज़ान अशा उष्ण वातावरणात सुरू आहे . अशा वातावरणामध्ये दोन चार तास जरी माणूस पाण्याविना राहिला तर त्याला अशक्तपणा आल्यासारखे वाटते . मात्र अशा वातावरणात सुद्धा पाच ते अकरा वर्षातील लहान मुले रोजा ठेवण्याचे धारिष्ट्रय दाखवीत असल्याचे सगळीकडे दिसून येत आहे . यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत रोज़ा ठेवल्यानंतर रोज़ेदारांना अल्लाहकडून अदृश्य शक्ती मिळते यावर शिक्कामोर्तब होतो . यामुळेच लहान मुलेही रोजा ठेवण्यास समर्थ ठरताना दिसतात . अशाच प्रकारे आयेशा पठाण ने ही रोजा ठेवल्याने तीचे आजोबा हुसेन पठाण, शेख मोहम्मद भाई चुलते पत्रकार जावेद पठाण, सुभान पठाण, तुराब पठाण, प्रा.शौकत पठाण, समीर पठाण,पत्रकार निसार शेख, निहाल पठाण आदी नातेवाईकांनी तीचे चे अभिनंदन करत तीला शुभेच्छा दिल्या आहेत .
stay connected