SOLAPUR | माझ्या उमेदवारीची घोषणा केवळ औपचारिकता, काही दिवसात ती जाहीर होईल : Praniti Shinde
सोलापूर (प्रतिनिधी ) - आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मी जी टीका केली त्यामध्ये मी कोणाचेही नाव घेतले नाही. त्यामुळे वंचितने ट्वीटर वरील ती पोस्ट काढावी.
कारण मी फक्त म्हणाले कि, जे कोणी काँग्रेस, मविआ किंवा इंडिया आघाडीचे वोट डिवाईड करतं ते भाजपला मदत करते एवढंच मी म्हणाले. ही गोष्ट जाहीरशी बात है, त्यात त्यांनी असे ट्वीट का केले माहिती नाही. वंचितने असे का केले हे मला माहिती नाही. मी यापूर्वीही सांगितले की काँग्रेस माझ्या रक्तात आहे. याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील. वंचितने असे का केले, कालपर्यंत आम्ही सोबत होतो. माझे प्रामाणिक मत आहे कि भाजपविरोधी लोकांनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगते की जे कोणी काँग्रेस मविआ विरोधात काम करतात ते भाजपाला मदत करतात. मी कोणाचेही नाव घेतले नव्हते मात्र वंचित ने काय गृहीत धरून ती पोस्ट केली आहे माहित नाही. मात्र ती पोस्ट त्यांनी काढावी. लोकात असा चुकीचा मॅसेज पसरवणे बरोबर नाही. असे प्रणिती शिंदे यांनी सांगीतले .
तसेच इलेक्ट्रॉल बॉण्ड बाबत विचारले असता त्या म्हणाल्या की इलेक्ट्रॉल बॉण्ड चे सत्य बाहेर आले पाहिजे.अनेक कंपन्या अशा आहेत ज्यांच्यावर आज रेड झाले आणि उद्या त्यांनी इलेक्ट्रॉल बॉण्ड खरेदी केले. आज रेड झाली आणि उद्या त्यांनी एक कोटी शंभर कोटी दीड हजार कोटीचे इलेक्ट्रॉल बॉण्ड भाजपच्या खात्यात जमा केले. ईडीची भीती दाखवून स्वतःसाठी पैसा जमा करण्याचे काम भाजपने केले. देशात आता भाजप विरोधात वारे व्हायला लागले आहे. पहिला निर्णय चंदीगड, दुसरा इलेक्ट्रॉन बॉण्ड आणि तिसरा एसबीआयला कंपलसरी केले. मी न्याय प्रणालीचे आभार मानते. किमान ते तरी भाजपच्या दबावाखाली आले नाहीत.
उमेदवारी बदल बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की माझ्या नावाच्या उमेदवारीची घोषणा केवळ औपचारिकता आहे. काही दिवसात ती जाहीर होईल.
भाजपावर टिका करत प्रणिती शिंदे म्हणाल्या की देशातील लोक काँग्रेस कार्यकर्त्यांची वाट पाहते. आम्ही त्याचा पर्दाफाश करतोय.
लोक आता भाजपच्या 10 वर्षाच्या कारभाराला कंटाळले आहेत.
ही लोकशाही आहे, इथे कोणी कोणाला घाबरू नये. आम्ही कामाला लागलो आहे कारण आमचं आता ठरलंय.त्यांचे कधी ठरणार माहिती नाही. निवडणूक ही निवडणूक असते. कोणीही गाफिल राहू नये. शेवटी विजय लोकांचा होणार आहे.
पुलवामा सारखी घटना भाजपा काळात होतात यावर प्रतिक्रीया देताना त्या म्हणाल्या की सर्वे मध्ये भाजपाला कमी जागा मिळणार आहे असे लक्षात आल्यावर ते सांगता येत नाही. मात्र आपण सावध राहायला हवे कारण जनतेला इमोशनल करण्यासाठी काही ना काही कांड करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण ते सत्तेसाठी हपापलेले आहेत
धार्मिक राजकारणावर बोलताना त्या म्हणाल्या की धर्मासोबत कर्मही महत्वाचे आहे. काम करा आम्ही त्याचे स्वागत करू. धर्मासोबत काम ही तितकेच महत्वाचे आहे.
अशी प्रतिक्रीया काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली .
stay connected