खुंटेफळ साठवण तलाव हा प्रकल्प होण्यासाठी माझे देखील योगदान आहे---माजी आ.भीमराव धोंडे

 खुंटेफळ साठवण तलाव हा प्रकल्प  होण्यासाठी माझे देखील योगदान आहे---माजी आ.भीमराव धोंडे 

---------------------------------------



--------------------------------------

 आष्टी (प्रतिनिधी)

 कृष्णा मराठवाडा योजनेअंतर्गत मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी खुंटेफळ साठवण तलावाची निर्मिती व्हावी यासाठी आपण देखील प्रयत्न केलेले आहेत विधानसभा सदस्यत्वाच्या कालावधीमध्ये तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळोवेळी निधी मागणी आणि त्यानंतर हा प्रकल्प पर्यावरण परवानगी अभावी बंद झाल्यानंतर केंद्र शासनाकडे आष्टी हा पुरेशा प्रमाणात पाऊस होत नसल्यामुळे सतत दुष्काळी तालुका असल्यामुळे खास बाब म्हणून भारत सरकारच्या केंद्रीय पर्यावरण विभाग मंत्रालय आणि वनविभाग यांचेकडे हा प्रकल्प सुरू व्हावा यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामुळे खुंटेफळ साठवण तलाव या प्रकल्पासाठी माझे देखील योगदान आहे असे प्रतिपादन शिक्षण महर्षी माजी आ. भीमराव धोंडे यांनी केले.

        खुंटेफळ साठवण तलाव या प्रकल्पाच्या कामे मंजूरी वरून विधान परिषद सदस्य आ.सुरेश धस आणि विद्यमान विधानसभा सदस्य  आ.बाळासाहेब आजबे यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे.

     वास्तविक पाहता आष्टी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकल्प होणे ही विकासाभिमुख बाब असून तालुक्याच्या या विकासात्मक भावनेने या तलाव कामाच्या पूर्णत्वासाठी काम करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच असते त्यामुळे श्रेय वादाची लढाई योग्य नाही.वास्तविक पाहता खुंटेफळ साठवण तलाव सन २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना या युतीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या प्रकल्पा विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.मात्र आपण विधानसभा सदस्य या नात्याने कोणत्याही प्रकारच्या श्रेयवादासाठी तक्रारी वगैरेच्या भानगडीत न पडता दुष्काळी आष्टी तालुक्यासाठी हा प्रकल्प पूर्ण व्हावा हा उद्देश ठेवून या प्रकल्पासाठी निधी मागणी केलेली आहे.पर्यावरण वन आणि हवामान बदल विभाग केंद्रशासन यांच्याकडून या प्रकल्पासाठी आवश्यक ती परवानगी न मिळाल्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले होते.त्यामुळे तात्कालीन केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल विभागाचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचेकडे खास बाब अंतर्गत ही परवानगी देण्यात यावी अशी विनंती केलेली होती. त्यानंतर या पर्यावरण विभागाची परवानगी मिळालेली आहे.या तलावासाठी महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात यावी यासाठी देखील आपण राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे त्यामध्ये जा.क्र.१४०/

२०१८ दि.९फेब्रूवारी २०१८  या पत्रांमुळे निधी मागणी केलेली असून जा. क्र.३४८/२०१८ दि.२४/२०१८ रोजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पर्यावरण विभागाच्या परवानगी बाबत विनंती केलेली आहे सततच्या दुष्काळी असलेल्या आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प असल्यामुळे याच्या श्रेयवादामध्ये आपण कधीही पडलो नाही आपण ते कर्तव्य म्हणून केलेले होते परंतु विधान परिषद सदस्य  आ.धस आणि विधानसभा सदस्य आ.आजबे  या दोन विद्यमान आमदारांच्या सध्याच्या श्रेय वादाच्या लढाईमुळे आपण आपल्या कार्यकाळामध्ये या प्रकल्पासाठी काय केले आहे. हे आष्टी तालुक्यातील जनतेला माहित असावे म्हणून आपण ही माहिती जनतेसमोर ठेवत आहोत असेही माजी आमदार भाजपनेते भीमराव धोंडे यांनी म्हटले आहे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.