रुई नालकोल येथे विज पडून २२वर्षीय युवकांचा मृत्यू.

 रुई नालकोल येथे विज पडून २२वर्षीय युवकांचा मृत्यू.



कडा/ प्रतिनिधी .

आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील शेतात  ऊस तोड मजुराचा विज पडून मृत्यु झाल्याची घटना काल सायं . ४ वाजता घडली .

आनंदा सोनवणे हे पत्नी सुनंदा मुलगी संगीता व मुलगा सुरेश हे सर्व  रा. नानखुर्द  .ता .एरंडेल .जि . जळगांव येथील रहिवासी असुन त्यांनी  गौरी शुगर (हिरड गांव)  ता. श्रीगोंदा जि . अहमदनगर या कारखान्यावरची मुकादमाकडुन उचल घेऊन  ऊस तोडण्यासाठी आले होते .

नगर जिल्ह्यातील सर्व ऊस संपल्यानंतर ते सर्व ऊस तोड कामगार आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील एका शेतकर्यांच्या शेतात ऊस तोडण्यासाठी आले होते.

परंतु विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला व त्यामध्ये विज कोसळून ऊस तोड मजुर सुरेश सोनवणे या युवकाचा मृत्यू झाला. 

मुकादम व तेथील शेतकरी यांनी पोलीस दूरक्षेत्र कडा येथे कळवले व मयत याला प्राथमिक आरोग्य केंद्र कडा येथे शवविच्छेदनसाठी आणण्यात आले व पोलीस दूरक्षेत्र कडा येथील एस पी आय नरावडे पोलीस हेडकॉन्स्टेबल सय्यद ,सचिन गायकवाड,दिपक भोजे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी ठेवण्यात आला आहे.

 शवविच्छेदन करून आपल्या गावी  जाणार असल्याचे मयताचे वडील  आनंदा सोनवणे यांनी सांगितले. त्यांना अनिल तात्या ढोबळे , राजु गायकवाड यांनी मदत केली.















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.