मोबाईलवर स्टेटस ठेवून मराठा योद्धा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या ; आष्टी तालुक्यातील घटना : Maratha Reservation
कडा प्रतिनिधी / अनिल मोरे
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे साडेपाच वाजता घडली.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही व हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही अशी पोस्ट रात्री दोन च्या सुमारास मोबाईलवर केली व नवयुवक प्रवीण दिलीप सोनवणे वय वर्ष 29 या युवकांने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली.
प्रवीण चे शिक्षण चांगले झाले होते तरीही त्याला नोकरी लागत नसल्यामुळे तो छोटीशी पान टपरी चालवत होता. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक लढ्यात तो सहभागी होता.
शेरी चे सरपंच संदीप खाकाळ साहेब यांच्या समवेत प्रवीण सोनवणे हा सदैव मराठा समाजासाठी कुठेही लढा सुरू असला की तो जायचा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी यासाठी अहोरात्र लढायची त्याची तयारी होती . त्यामुळे मनामध्ये विचार करून सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांनी मराठा समाजासाठी आपले बलिदान दिले.
आज दुपारी दोन वाजता शेरी बुद्रुक येथील स्मशानभूमीत प्रवीण सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



stay connected