गावागावांतील अण्णाजी पंत,खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ ओळखा-डॉ.जितीन वंजारे

 *गावागावांतील अण्णाजी पंत,खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ ओळखा-डॉ.जितीन वंजारे*



         मित्रांनो महाराष्ट्राच्या कोणत्याही वाड्या वस्ती वरती,खेडोपाडी,गाव तांड्यावर जा,जगात कुठेही जा पळसाला पाने तीनच असतात याचाच अर्थ असा की तेथील यंत्रणा सगळी समानच असते फक्त आमच्याच गावात खूप जास्त प्रमाणात होते किंवा जे ह्या ठिकाणी घडतं ते इतर कुठेच घडत नाही असं सर्रासपणे चर्चिल जात. सकाळ-सकाळ खेडेपाड्यांमध्ये खूप लोक गावातील ग्रामदैवताच्या दर्शनासाठी गावात येतात आणि वडाच्या झाडाखाली,चिंचेच्या झाडाखाली पारावर बसून राजकारण,समाजकारण,शेती अर्थकारण इत्यादी विषय चर्चिले जातात. आपण नक्कीच थोडसं बाजूला बसून ते नेमके काय गप्पागोष्टी करतात याकड बारकाईने लक्ष देऊन पाहिल्यास गावामध्ये तीन प्रकारची चर्चा करणारी माणसं आढळत असतात त्यामध्ये एक स्वतःच्या संसारीक प्रश्नांमध्ये गुरफडून गेलेला चिंताग्रस्त,दवाखाना कोर्ट कचेरी मध्ये दबलेला,दुसरा मित्र, आप्तेष्ट नातेवाईक यांच्या सुखदुःखाविषयी चर्चा करणारा,भावनिक,कुठेही पंगत असली की नियोजन लग्न कार्यात अग्रेसर असणारा आणि तिसरा एक वर्ग असतो तो राजकारण समाजकारण आणि पुढारपण करणारा ,गाव जिल्हा देश प्रदेश आणि विदेश यावरती चर्चा करणारा वर्ग असतो. त्यामध्ये आपला नेता,आपली बोलीभाषा, आपला परिसर,आपली शेतीमाती, आपलं राहणीमान, वातावरण किंवा सभोवताली घडणाऱ्या बऱ्याचश्या गोष्टींचा दैनंदिन घडणाऱ्या गोष्टींचा देश विदेशात घडणाऱ्या गोष्टींच्या चर्चा यावर विषयसुख घेणारा असतो. सध्याच्या वातावरणामध्ये मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा असताना गावांमध्ये विशेष म्हणजे मराठा समाजामध्ये एकीचं वातावरण दिसत आहे.चर्चा फक्त आरक्षणाची च होत आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाज जो भूतो न भविष्य एकत्र आलेला आहे त्यांच्या भावनेचा एकतेचा कसलाच विचार न करता केवळ आपल्या आर्थिक राजकीय हेतूपोटी समाजहीत बाजूला सोडून एकत्र येत असलेल्या समाजाला सुरुंग लावून आपल्यातलेच अण्णाजी पंत,खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ होण्याचे महापाप करत आहेत त्यांना आपण ओळखले पाहिजेत आणि त्यांना गव्हातील खड्याप्रमाने बाजूला सारले पाहिजे असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक डॉ.जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.

          मित्रानो गावा-गावात वेगळीच विचाराची नांदी घुमती आहे काही चिलट न धुतलेल्या बोच्याला चिकटल्यागत आस पास घोंगुन कुणाच्या तरी दावणीला समाज बंधू नेऊन बांधवले जात आहेत .कोणाची तरी सुपारी घेऊन कोणी तरी स्वतःच वजन वाढवतो आहे.गाव अंधारात जात आहे .विकासाचा काटा झीरो कडे जात आहे . ह्यो नाही तो नाही सगळे एकाच माळेचे मणी आहेत.विकासाची फुगडी खेळून बाप आणि माय वाटून घेऊन सांभाळ करणाऱ्या बिन आई-बापाच्या औलादी काहीतरी शक्कल लढवून गावा-गावात असमानतेची कोल्हेकुई ठोकत आहे. गावा गावात झालेली सत्तापालट विकासाच्या आशेचा किरण घेऊन येणार म्हणून तरुणांची माथी फिरून एन केन सत्तापालट झाली खरी पण आता गाव एका विशिष्ट लोकांखाली गहाण ठेवन्याचा कार्यक्रम चालू झाला आहे.मराठा समाज जो सगळ्यांचा मोठा भाऊ होता ज्या समाजाने सगळ्यांना पोसल सांभाळलं बारा बलुतदार तयार केली आणि त्यांच्या हक्काचं त्यांना त्यांना दिलं तोच आज अडचणीत आहे त्या समाजाच्या तीव्र भावना असताना गावा गांवात पैसे घेऊन अण्णाजी पंत,खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ तयार होत आहेत .स्वतःचा खिसा भरवून लोक कोणाच्यातरी दावणीला बांधली जात आहेत यांना ना समाजाचं देणं घेणं आहे ना गावाच्या विकासाच देणं घेणं आहे .हे पुरते स्वार्थी लोक आहेत त्यांना बहिष्कृत केलं पाहिजे.गावात विषमतेची फुगडी खेळणाऱ्या मनुवादी भडव्याना ओळखून त्यांचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत अश्या लोकांचां उद्देश फक्त एकच असतो स्वतःच राजकीय वजन वाढवणं ते पण दलाली च्या पैशावर मग समाज गेला बोंबलत यांना काहीएक देणंघेणं नसतं.एकीकडे आपला समाज स्वतः गरिबीच्या सावटाखाली लढत असताना समाजाचा कसलाच विचार न करता कुणाचातरी गुलाम होण्यासाठी जो माणूस समजतील भोळ्या भाबड्या लोकांना घेऊन तरुणाची माथे फिरवून त्यांना कोणाच्यातरी दावणीला नेऊन बांधतो आहे अश्या कुकर्मी स्वार्थी राजकारणी कुत्र्यांना समाजातील बांधवांनी आवर घातला पाहिजे नसता आपल्यातले अण्णाजी पंत, खंडूजी खोपडे,सूर्याजी पिसाळ आपलाच घात करतील. छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा,शेतकऱ्यांच्या काडीचीही गुलामी सहन करणार नाही,शेतकरी हित जपून त्यांची कडीही गहाण ठेवणार नाही,हे जनतेच राज्य व्हावं ही श्रींची इच्छा,पर स्री मातेसमान,बादशाहाच्या हातावर तुरी, दील्लीचाही तख्त राखतो महाराष्ट्र माझा,गडकिल्ले संरक्षण,शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी केलेलं काम ,धर्म रक्षण, खरेपणा , जाणता राजा ,समतेचा मानकरी ह्यावर चालणाऱ्या माणसांना जपून महाराजांचं स्वराज्य चालवलं पाहिजे.आपल्या बांधवांना हिताचं सांगून त्यांचा उध्दार केला पाहिजे पण येथील अण्णाजी पंत,सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे गाव हातात आला की समाजाशी बेईमान होताना दिसत आहेत ते खड्याप्रमाने बाजूला सारा नसता पेशवाईच्या आयत्या पिठाच्या रेघुट्या पाहायला तयार रहा असा सबुरीचा सल्ला सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय अभ्यासक डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.माणसं ओळखून यापुढे मत द्यायला पाहिजेत नसता कसलाही कठाळया गावाच्या माथी मारून गावाचं वाटोळं करू नका .मनुवादी लोक तर अजिबातच निवडून देऊ नका गावागावात शांतता प्रस्थापित करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम करणाऱ्यांना पायउतार केलं पाहिजे .गावात व्यसनमुक्ती झाली पाहिजे काही गावांत तर दस्तरखुद्द सरपंच च म्हणतो आहे की मी आहे टाक दारूचा धंदा,टाक पत्त्याचा क्लब,टाक गांज्याचा ठेला अस म्हणून जन वळू पोसल्यागत लोक पोसलेली आहे. गावागावात दोन चार जण एकत्र येऊन क्लब चालवले जात आहेत आणि तेथील सरपंच पोलिसांना मॅनेज करून दोन नंबर धंद्यांना उत् आणत आहे हे बंद झालं पाहिजे .कारण पोरं शिकली पाहिजेत गावाचा विकास गावातील सुशिक्षित आणि अधिकारी वर्ग यावर अवलंबून असतो ना की त्या गावात बिअर बार किती ? वाईन शॉप किती ? पत्याचे क्लब किती?.त्यामुळे गावात कोटिंच मंदिर असेल तर किमान पन्नास लाखाची शाळा असली पाहिजे किंबहुना दोन कोटीची असणं अपेक्षित आहे.त्यामुळे ज्या गावात षंड आणि निष्क्रिय सरपंच असेल जो व्यसनमुक्ती,गावात दोन नंबर धंदे बंदी,गावात दारू आलीच नाही पाहिजे,गावात पत्याचे क्लब बंद झाले पाहिजेत असा विचार करेल त्यालाच पुन्हा आणि पुन्हा निवडून दिले पाहिजे.










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.