गायी चोरणाऱ्या चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या तीन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल.
कडा /प्रतिनिधी.
आष्टी तालुक्यातील डोगंरगण रस्त्यावर बाळु धोंडीबा ओव्हाळ रा. कडा या . आष्टी यांच्या शेतामध्ये वस्तीवरील दोन गायी गोठ्यात बांधलेल्या होत्या ११ मार्च रोजी6.30ते9.30वाजेच्या सुमारास कडा शिवारातील डोंगरगण रस्त्या लगत ओव्हाळ वस्ती या गायीला चारा पाणी करण्यासाठी बाळु धोंडीबा ओव्हाळ हे गेले असता दोन्ही गायी या गोठ्यात नसल्याने पोलीसात तक्रार दाखल केली परंतु पोलीसांनी त्या घटनेची संपुर्ण पाहणी केली.
त्या आरोपींचा पाठलाग केला व आरोपींना उंदरखेल शिवाराजवळ राजलक्ष्मी पेट्रोल पंपजवळ पोलीसांनी व गावकर्यानी त्या तीन आरोपीला पकडण्यात यश आले .
आरोपीचे नांवे पुढीलप्रमाणे.
1)सोमनाथ संतोष कर्डीले वय वर्ष १९
या. डोंगरगण रोड कडा.
२)शिवराज सुनिल पवार वय वर्ष १९ रा. शेरी (ब्रु)
३)रोहीत गोरख रोहकले वय वर्ष २१. रा. नालेगांव. अहमदनगर.
वरील या आरोपी विरूध्द कडा पोलीस चौकी येथे गुन्हा दाखल करून आरोपी ताब्यात घेतले आहे.
पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जाधव,दिपक भोजे, सचिन गायकवाड हे करत आहे.

%20(26).jpeg)
stay connected