KOLHAPUR | 20 जानेवारीपासून मुंबईत होणाऱ्या आमरण उपोषणामध्ये कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होणार सहभागी

 KOLHAPUR | 20 जानेवारीपासून मुंबईत होणाऱ्या आमरण उपोषणामध्ये कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने होणार सहभागी



20 जानेवारीपासून मुंबईत होणाऱ्या आमरण उपोषणामध्ये कोल्हापुरातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आरक्षण घेऊनच मुंबईतून आता माघारी परतुया असा निर्धार करत,  संपूर्ण जिल्ह्यात याबाबत आता जनजागृती करण्यात येणार असल्याचं, सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दसरा चौकात सुरू असलेल साखळी आंदोलन उद्या सोमवारपासून स्थगित करण्यात येत असल्याचही त्यांनी यावेळी जाहीर केलं. 


मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णायक इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आता नाही तर कधी नाही या भावनेतून मराठा आरक्षणा संदर्भात जरांगे यांचा हा निर्णायक लढा असून हा लढा यशस्वी करण्यासाठी कोल्हापुरातूनही सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होणार आहेत. अशी माहिती सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  त्यानुसार गेली साठ दिवसाहून अधिक काळ ऐतिहासिक दसरा चौकात सुरू असलेले साखळी आंदोलन उद्या सोमवारपासून स्थगित करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात पोहोचण्याचा निर्णय कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने घेतला आहे. मराठा आरक्षणाचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावर असून जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी पोहचून समाजामध्ये जनजागृती केली जाणार आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाची ताईत आहेत. मुदतीत आरक्षण द्या, अन्यथा सरकारला मुंबईत होणारे आंदोलन पेलवणारे नसेल. असा इशाराही यावेळी वसंतराव मुळीक यांनी दिला.


दरम्यान सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह पिटिशन मान्य झाल्याच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या सरकारमधील काही मंत्री पसरवत असल्याचा आरोप अॅडवोकेट बाबा इंदुलकर यांनी केला. मुळातच सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र समाजाची दिशाभूल करण्याकरिता सरकारमधील काही मंत्री चुकीची माहिती समाजाला देत आहेत. 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.