बाबासाहेबांचा कोणी ही अपमान करु नये

 बाबासाहेबांचा कोणी ही अपमान करु नये



                अंकुश शिंगाडे नागपुर ९९२३७४७४९२

       चवदार तळे......इतिहास साक्षीचा पुरावा.त्यापुर्वी या देशात विश्वकोटीचा विटाळ होता.भेटीबंदी,व्यवहारबंदी,बेटीबंदी रोटीबंदीने कळश गाठला होता.सारा देशच पोखरला होता.स्पर्शाचा विटाळ तर सार्वजनिक होता.

      सकाळी दहा वाजेपर्यंत तसेच रात्री अंधार पडल्यावर गावात जायला मनाई होती.सकाळी यासाठी गावात जायचे नाही कारण स्पृश्य स्रीया अंगणात शेणाचा सडा टाकतात.सडा टाकतांना त्यात पाणी असते.अंगण ओलं असते.त्यात पाय उमटतात.सावली पडते त्यामुळे विटाळ होतो तसेच दिवस मावळल्यावर दिसत नसल्याने अंगणात अस्पृश्य माणुस जाणुनबुजून एखाद्या अस्पृश्य माणसाला हात लावु शकतो हा धोका.त्यापेक्षा बंदी घातलेली बरी याचा विचार करुन दिवस मावळल्यावर बंदी.

      पाण्याला स्पर्श करणे हा विटाळ समजण्यात येई.त्यामुळे साहजिकच सर्व प्रकारच्या गोष्टीपासुन ही दलित मंडळी वंचित होती.जणु हा परिसर विटाळ परिसर व प्रत्यक्ष गाव विटाळ गाव बनलं होतं.मात्र गावातील काही लोकांना वाटायचं की हा विटाळ बंद व्हावा.पण ते काही करु शकत नसत कारण तसा प्रयत्न करणा-यांना गाव समाजात व्यवहारबंदी करीत असे.वाळीत टाकत असे.वाळीच्या वेदना भयंकर होत्या.त्यामुळे चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला नसता तर भेदभाव कधीही मिटला नसता.असे म्हणणे खरे ठरते.

      चवदार तळ्याच्या सत्याग्रहात इतर समाज साथ देवो अगर न देवो,पण महार जातीने कंबर कसली होती.याचा परिणाम चवदार तळ्याच्या आंदोलन वेळी दिसला.दि.१२/१२/१९२७ ला सनातन समाजाने चवदार तळे चौधरी कुटुंबाचे असल्याने हे तळे निर्णय होईपर्यंत चवदार तळ्याचे पाणी पिण्यास दलितांना बंदी असावी.असे जे म्हणणे मांडले.त्याला सबब न्यायालयाने स्थगिती देत म्हटले की निर्णय होईपर्यंत अस्पृश्य माणसाला चवदार तळ्याच्या भागात जाता येवु नये.तरीही असंख्य संख्येने ही महार मंडळी प्रसंगी कैद भोगु पण चवदार तळ्यावर जावु यासाठी स्वतः मंजुरी फामवर सही करण्यासाठी रांगेने प्रतिज्ञापत्र भरण्यासाठी उभी होती.चवदार तळ्याचा मुकदमा तारीख पे तारीख करत तब्बल दहा वर्ष चालला.यात बाबासाहेबांना अपार त्रास सहन करावा लागला घरदार स्वतःची पोरं बारं प्रकृती संसार याकडे लक्ष न देता बाबासाहेबांनी या मुकदम्यासाठी सर्वस्व पणाला लावले.ते येथील तमाम अस्पृश्य समाजाने कधीच विसरु नये.कधीकधी त्यांच्या जवळ पैसेही नसायचे.तरीही मुंबईला जावुन हा खटला लढला गेला.केवळ चवदार तळ्यावर जावुन पाण्याला स्पर्श करुन चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला नाही.

        खालच्या न्यायालयात खटल्याचा फैसला १९३४ ला लागल्यानंतरही सनातन्यांनी अाणखी पिटीशन हायकोर्टात टाकली.पण बाबासाहेब नरमले नाहीत.एरवी त्यांच्यासोबत लढायला प्रति वादी म्हणुन शिवतरकर मास्तर, कृष्णा सायनाक, गण्या मालु ,कानु विठ्ठल इत्यादी मंडळी होती.हा खटला १९३७ ला जींकला जींकणे भागच होते.जर हा खटला बाबा हारले असते तर आजही पाणी पिण्यास दलितांना बंदी राहिली असती.आजही विटाळ राहिला असता.

        महत्वाचे म्हणजे बाबासाहेब चवदार तळ्याचा खटला जींकले.त्यानुसार पाणी पिणे स्पर्श करणे.ह्या बाबत विटाळ पाळणे बंद झाले.महाडात पिण्याच्या पाण्यासाठी दुसरी स्वतंत्र्य व्यवस्था नसल्याने सनातन्यांना अस्पृश्यांना पाणी पिवु देणे भागच होते.नाहीतर न्यायालयाचा अवमान म्हणुन स्पश्यांना किती संकटाला सामोरे जावे लागले असते याचा अंदाज लावणे कठीण.२५ डिसेंबर १९२७ ला मनुस्मृती जाळुन दलितांवर लादण्यात येणा-या शिक्षेची अक्षरशः बाबासाहेबांनी होळीच केली होती.त्यामुळे मनुच्या नियमांना कात्रीच लावता आली.तसेच पोशाख बदलल्याने अस्पृश्य ओळखु न आल्याने विटाळ संपुष्टात आला.

        आज बाबासाहेब हयात नाही.पण त्यांनी दलिंतांसाठी व इतरही समाजासाठी आयुष्य वेचलं.म्हणुन त्यांचे जागोजागी पुतळे बांधले आहेत.हे पुतळे म्हणजे दलित व इतर समाजाची प्रेरणा तसेच त्यागाचं प्रतिक.केवळ त्यांनी अस्पृश्यांसाठीच केलं नाही तर ती मनुस्मृती जाळुन स्रीयांनाही दास्यत्वातुन सोडवले.मग ती कोणत्याही जातीची असो.एवढेच नाही तर संविधान लिहितांना देशातील सर्व नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समतेचा अधिकार मिळवुन दिला.यानुसार नोक-या पदोन्नति मधुन कोणावर अन्याय झाल्यास त्याला न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार ही देशातील सर्वच जातीधर्माच्या लोकांस प्राप्त झाला.त्यामुळे खरं तर या देशातील नागरिकांनी बाबासाहेबांचे उपकार मानले पाहिजे.पण तसे घडत नाही.आजही बाबासाहेबास त्यांच्या मृत्युपरांत छळले जाते.शेणाचा पुतळ्यावर मारा केला जातो.राग कोणता तर चवदार तळ्याचा.....कदाचित या समाजकंटकांना चवदार तळ्याच्या घटनाक्रम ही माहित नसेल.

        बाबांनो हे लक्षात घ्या की चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या वेळी आम्हाला तुमच्याच समाजातील काही आजोबा पणजोबांनी माणुसकीच्या नात्याने मदत केली होती.तुम्ही का माणुसकी सोडताय?बाबासाहेबांनी केवळ अस्पृश्यच लोकांसाठी केलं नाही तर तुमच्याही जातीसाठी केलं ओबीसी साठी ३४९ वी कलम जेव्हा लिहीली तेव्हा तुमच्याच समाजातील संसदेतील लोकांनी विरोध केला होता.त्यावेळी याच बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.केवळ तुमच्यासाठी.हे विसरु नका.हे माहित आहे का तुम्हाला.

         संविधान बनवितांना समिती बनवली खरी.पण ती कुचकामी ठरली.सगळं बाबासाहेबांना करावं लागलं.शिवाय संसदेत विधेयकं पुराव्यासह मांडावी लागली.सरतेशेवटी डाँ.राजेंद्रप्रसांदानी बाबासाहेबांची पाठ थोपटली.हे किती जणांना माहित आहे$हे संविधान अठरापगड जातीतील कोणत्याच माणसाला बनवता आले नाही.ही शोकांतिका या भारताची.तरीही तुम्ही या बाबासाहेबांचा अपमान करता.त्यांच्या लेकरांचा अपमान करता.

       कुणीही बाबासाहेबांचा अपमान करु नये.आपण सगळे एक आहोत.बाबासाहेब प्रेरणास्रोत आहेत सर्वांचे.मग ते कोणत्याही जातीतील का असेना.

Ankush Shingade Nagpur






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.