KALYAN | डोंबिवलीतील खाडीत बुडालेल्या वडील आणि मुलीची ओळख पटली; प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू
डोंबिवलीत राजूनगर कुंभरखान पाडा परिसरातील खाडीत चिमुकली आणि तिचे वडील बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांसह फायर ब्रिगेड ने त्यांची शोध मोहिम सुरु केली आहे. अनिल सुरवाडे असे या इसमाचे नाव असून त्यांच्या मुलीचे नाव इरा आहे. ते याच परिसरात राहणारे होते. डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरात खाडी किनारी अनिल सुरवाडे व त्यांची 2 वर्षाची मुलगी इरा सुरवाडे आले होते. ती मुलगी खेळत होती. खेळत असताना ती खाडी किनारी गेली. अचानाक ती पाण्यात पडली. तिला पाहून बसलेले तिचे वडील अनिल तिला वाचविण्यासाठी धावले. त्यांनी पाण्यात उडी मारली. चांद शेख नावाचा तरुण या दोघांना वाचविण्यासाठी धावला. मात्र, तोपर्यंत ते दोघेही बुडाले होते. काही अंतरावर चांद शेख यांनी त्या त्यांचा हात पाहिला. मात्र, तो त्यांना वाचवू शकला नाही. त्याने याबाबत माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत याची माहिती विष्णूनगर पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलीस पथकासोबत खाडी किनारी पोहचले. फायर ब्रिगेडचे पथकही दाखल झाले आहेत. शोध मोहिम सुरु झाली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
stay connected