कोमल भोंडवे यांची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून एन टी सी मधून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल धनगर समाज संघटनेच्या वतीने सत्कार प्रत्येक घरातली मुलगी अधिकारी झाली पाहिजे - प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिपादन

 कु.कोमल भोंडवे यांची एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून एन टी सी मधून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल धनगर समाज संघटनेच्या वतीने सत्कार प्रत्येक घरातली मुलगी अधिकारी झाली पाहिजे - प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिपादन 





दि२४/१२/२०२३रोजी बीड येथे कोमल भोंडवे राहणार  पिठ्ठी  ता.पाटोदा जि. बीड हिने जाहिरात 2022 महाराष्ट्र लोकसेवा आयोग प्री परीक्षा नोव्हेंबर 2022 मेन्स परीक्षा ऑक्टोबर 2023 या घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तिने एमपीसी परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून (एन टी सी )मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल बीड येथे प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी या सत्काराचे आयोजन केले होते.

कोमल भोंडवे ही  शेतकऱ्याची मुलगी असून तिचे पहिली ते चौथी शिक्षण पिठ्ठी येथे झाले तर पाचवी ते आठवी शिक्षण नायगाव या ठिकाणी झाले नंतरच्या शिक्षण तिने बीड येथे के एस के महाविद्यालय येथे घेतले नंतरचे शिक्षण त्यांनी सावरकर विद्यालय येथे घेतले अहोरात्र अभ्यास करून आपल्या आई-वडिलांचे नाव झळकण्यासाठी तिने जिद्द चिकाटी च्या जोरावर मेहनत करून आज महाराष्ट्र राज्याच्या लोकसेवा आयोग यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तिने (एनटीसी )मधून राज्यातुन प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल बीड जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे 

 कोमल भोंडवे यांची कौटुंबिक माहिती  यांच्या वडिलांचे नाव आप्पा भोंडवे हे (शेतीकरी)आहे तर आईचे नाव मंडुबाई भोंडवे शेतकरी आहे दोन भाऊ आहेत एक दिलीप भोंडवे कृषी सहाय्यक तर दुसरा दत्ता भोंडवे बी ए एम एस शिक्षण करत आहे तर एक बहीण अश्विनी प्रभाळे या आहेत. 

 सन्मान सोहळ्यावेळी  प्रकाश भैय्या सोनसळे अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज पासून आपल्या सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या घरातील मुलगी शिक्षणापासून दूर राहता कामा नये, शिक्षण क्षेत्रामध्ये आणून आपल्या प्रत्येक घरातली मुलगी अधिकारी झाली पाहिजे हे स्वप्न आज पासून सर्वांनी पहावे हीच ती वेळ आहे आपल्या मुली शिकवण्याची जर कोमल भोंडवे यांच्यासारखी जर मुलगी एमपीएससी मधून महाराष्ट्रातून एनटीसी मधून पहिली येत असेल तर तिच्या पावलावर पाऊल टाकून आपल्या घरातील प्रत्येक मुलगी अधिकारी झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.

  आज कोमल भोंडवे यांचा महाराष्ट्रातला पहिला सत्कार हा धनगर समाजाच्या वतीने बीड येथून होत आहे . 

  प्रत्येक घरातली मुलगी अधिकारी झाली पाहिजे ही जिद्द ठेवा. प्रकाश भैय्या सोनसळे  (अध्यक्ष धनगर समाज संघटना महाराष्ट्र राज्य)

  यावेळी नारायण भोंडवे माजी सरपंच यांनी बोलताना सांगितले आपले मुलं मुलगी घडवा नारायण भोंडवे,


 धनगर समाजाच्या रणरागिनीने बीड जिल्ह्याचे नावलौकिक केले सुदर्शन दादा भोंडवे यांनी बोलताना सांगितले.


कोमल भोंडवे यांच्यासारख्या मुलींचा आजच्या मुलीने आदर्श घेतला पाहिजे हनुमंतराव काळे साहेब यांनी बोलतांना सांगितले.


 कोमल भोंडवे यांनी त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले प्राध्यापक देवकते सर यांनी बोलताना सांगितले.


आजच्या मुलींना शिक्षणापासून दूर ठेवू नका मुलींना शिकवा व आपली मुलगी घडवा डॉ. राणी गावडे यांनी बोलताना सांगितले


कोमल भोंडवे यांनी घवघवीत यश मिळवल्याबद्दल राज्यातमध्ये तिचा जयघोष होणार... प्रियंका भोंडवे (आर एफ ओ बीड जिल्हा)


    यावेळी  नारायण भोंडवे जिल्हाध्यक्ष धनगर समाज बीड,माजी कृषी अधिकारी हनुमंतराव काळे, सुदर्शन दादा भोंडवे, रवींद्र गाडेकर माजी सरपंच ,अमोल भोंडवे तालुकाध्यक्ष पाटोदा, डॉ. निर्मळ सर डॉ.राणी गावडे, प्रियंका भोंडवे (आर एफ ओ बीड जिल्हा( दत्तात्रय किवणे सरपंच पिंपळादेवी, सुनिता केदार ,राधाताई भोंडवे, शितल मतकर जिल्हाध्यक्ष बीड, दातीर साहेब, बाळू प्रभाळे ,लांडकमारे दादा, धापसे सर, तळेकर ताई ,विष्णू पारखे ,यशवंत भोंडवे, सुनील भोंडवे ,सूर्यकांत कोकाटे ,विठ्ठल कोकाटे, लिंबराज भोंडवे ,निकिता भोंडवे, अक्षय कुडके जिल्हा परिषद क्लार्क ,पवन गावडे,दिगंबर चादर,श्रीराम डफळ ,प्रा.भोसले सर, प्रा.देवकते सर, प्रकाश डफळ ,पांडुरंग डफळ, सुरेन्द्र भोंडवे,सोमनाथ कुडवान, अशोक कैवाडे, वसंत भोंडवे,आशा प्रभाळे,अपुर्वा प्रभळे, आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.